रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शकुनी मामा’ म्हणून प्रसिद्ध असलेले गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 5, 2023 | 6:01 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Gufi Paintal Death

Gufi Paintal Death

महाभारत या मालिकेने एक काळ गाजवला होता. मालिकेतील प्रत्येक कलाकार घरोघरी पोहोचला.शकुनी मामांशिवाय महाभारत अपूर्ण आहे. शकुनी मामा या भूमिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते म्हणजे गुफी पेंटल. गुफी पेंटल यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती.या बाबतची माहिती अभिनेत्री टीना घइने दिली होती.(Gufi Paintal Death)

गेल्या काही दिवसांपासून गुफी पेंटल यांच्यावर अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुरवातीला त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा, ते फरिदाबाद होते, तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या नंतर त्यांना उपचारासाठी मुंबई मध्ये दाखल केले. आणि आज ५ जून रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

महाभारतासोबतच अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये गुफी पेंटल यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.यात रफू चक्कर हा चित्रपट तर अकबर बिरबल,सीआयडी, राधा कृष्णा या मालिकांचा समावेश आहे.अभिनयसोबतच कास्टिंग दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.जय कन्हेया लाल की, ही गुफी पेंटल यांची शेवटची मालिका होती.(Gufi Paintal Death)

हे देखील वाचा : ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे’.या वक्तव्यामुळे अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत

गुफी पेंटल यांना शकुनी मामा ही भुमीका कशी मिळाली हे देखील विशेष आहे. महाभारत या कार्यक्रमाचे कास्टिंग डिरेक्टर हे गुफी पेंटल स्वतःच होते. शकुनी मामा या भूमिकेसाठी ते योग्य चेहरा शोधत होते, काही नाव त्यांनी फायनल केली होती,पंरतु मालिकेच्या लेखकांनी शकुनी मामाच्या भूमिकेसाठी गुफी पेंटल यांची निवड केली. आणि गुफी पेंटल यांची ही भूमिका अजरामर झाली.

Tags: gufi paintalgufi paintal deathgufi paintal latest newsGufi Paintal SHAKUNI MAMAmahabharat shakuni mama
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ashish Vidyarthi Son Reaction

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नावर लेकाने केलं भाष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.