वयाच्या साठीत लग्नसोहळा उरकल्याने अभिनेते आशिष विद्यार्थी यांना बरंच ट्रोल करण्यात आलं आहे. फॅशन डिझायनर रुपाली बरुआ सोबत आशिष विद्यार्थी यांनी लगीनगाठ बांधली. वयाच्या साठीत त्यांनी लग्न केलं आहे. याआधी त्यांचं लग्न राजोशी यांच्यासोबत झालं होत. अनेक वर्ष राजोशी यांच्यासोबाबत सुखाचा संसार केल्यानंतर त्यांनी वयाच्या या टप्प्यावर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आशिष आणि राजोशी यांना एक मुलगा आहे. वडिलांच्या लग्नावर आपल्या मुलाची प्रतिक्रिया काय होती याबाबत आशिष विदयार्थी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.(Ashish Vidyarthi Son Reaction)
वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी लगीनगाठ बांधल्याने आशिष विद्यार्थी यांना बर्याच जणांनी ट्रोल केलं आहे. तर काहींनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा आशिष विद्यार्थी त्यांच्या आयुष्याबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हंटलय की, ‘त्यावेळी माझ्या आत खूप गिल्ट होते. माझ्या मुलाला मला असं जीवन नव्हतं द्यायचं.’
पहा काय म्हणाला आशिष विद्यार्थी यांचा लेक (Ashish Vidyarthi Son Reaction)
पहिल्या घटस्फोटाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘आम्हाला कळून चुकले होते की एकत्र राहणे आम्हा दोघांसाठी आता काही फायद्याचं नाही’. इतकेच नाही तर त्यांच्यातील बदलाचा परिणाम त्यांच्या मुलावरही होईल. आणि या गोष्टी पचवणं त्याच्यासाठी अवघड असेल याची कल्पना देखील त्याला होती.(Ashish Vidyarthi Son Reaction)
हे देखील वाचा – ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे’.या वक्तव्यामुळे अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
पुढे आशिष विद्यार्थी म्हणाले की, ‘जेव्हा माझ्या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या या निर्णयाची माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. एकमेकांना त्रास देण्याऐवजी त्याचे पालक प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलत होते, त्यामुळे तो खुश होता. पण ही गोष्ट तो अजूनही पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.’ अशा लेकाबद्दलच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.