Gashmeer Mahajani Answer To Fans: जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या खळबळजनक बातमीने सिनेसृष्टीसह प्रेक्षकांना देखील धक्का बसला .पुण्यातील घरी त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली. दोन दिवस त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत तसाच होता. या सर्व घटनेनंतर महाजनी कुटुंबीय विशेष चर्चेत आले.पुण्याच्या घरी रवींद्र महाजनी एकटेच राहायचे, दोन दिवस मुलाला कळलं नाही वडिलांचा मृत्यू झाला आहे. यांसारख्या अनेक गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला.मुलगा मोठा अभिनेता असताना वडील एकटे का राहत होते? यांसारखे अनेक आरोप गश्मीरवर करण्यात आले.(Gashmeer Mahajani Answer To Fans)
या आरोपांनंतर “ते माझ्या आईचे पती व माझे वडील होते, आम्ही त्यांना जास्त चांगलं ओळखतो” असं म्हणत गश्मीरने होणाऱ्या आरोपांबाबत मौन सोडले.त्याच प्रमाणे गश्मीरने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ask me question च्या माध्यमातून प्रेक्षकांशी सवांद साधला व नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देखील दिलेली पाहायला मिळाली.तसेच इटाईम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडील एकटे का राहायचे?दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर का आली? यावषीयी खुलासा केला. गश्मीर म्हणाला, “ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी, आम्ही व जवळच्या लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती.”
गश्मीरने नेटकऱ्याला दिले सडेतोड उत्तर(Gashmeer Mahajani Answer To Fans)
गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा एकदा प्रेक्षकांसोबत सवांद साधला. त्यावेळेस गश्मीरला त्याच्या कामासंबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले, गश्मीरने देखील चाहत्यांच्या शंकांचं निरसन केलेलं पाहायला मिळालं. परंतु अनेक गोष्टींबाबत स्पष्ट खुलासा करून देखील आजही गश्मीरला वडिलांच्या मृत्यूबाबत तेच प्रश्न विचारले जातात. एका नेटकाऱ्याने गश्मीरला प्रश्न विचारले,”वडिलांच्या मृत्यूचा दोष सगळे तुलाच देत आहेत, खरं कारण सर्वांना माहित नाही. मग उघडपणे सर्वांना सांग ना!” यावर गश्मीर अगदी मिश्कीलपणे उत्तर देत म्हणाला,”तू तुझं आयुष्य छान जग, जर करायला फारसं काही नसेल तर झोप.”

हे देखील वाचा: “तो माझा बाप आहे रे,अपघातानंतर…”संजय मोने यांना घट्ट मिठी मारून जितेंद्र जोशी भावुक
जसे विरोधात बोलणारे आहेत तसेच गश्मीरचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.एका चाहत्याने गश्मीरला असे देखील विचारले,”तुम्हला माहित आहेत ना तुमचे चाहते तुमच्या सोबत आहेत? आशा आहे की तुम्हला माहित असेल की तुमचे चाहते तुमच्या सोबत आहेत?” त्यावर गश्मीरने,”नक्कीच, माझ्या पर्यंत येणाऱ्या सर्व वाईट आणि चांगल्या गोष्टी मी वाचत असतो” असे उत्तर दिले.(gashmeer mahajani about ravindra mahajani)