शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेत आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली, जवळच्या मैत्रिणीचाही कार अपघातात मृत्यू

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2024 | 2:07 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Actor Chandu Commit Sucide

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेत आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली, जवळच्या मैत्रिणीचाही कार अपघातात मृत्यू

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांच्या निधनानंतर साऊथ टीव्ही विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका टेलिव्हिजन अभिनेत्याने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांतची ‘त्रिनयणी’ मालिकेतील सहकलाकार पवित्रा जयरामला हैदराबादमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातात जीव गमवावा लागल्याच समोर आलं. त्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता चंदू हा त्याच्या मनीकोंडा येथील घरी संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. तेलुगू अभिनेता चंदूच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांना व मनोरंजन क्षेत्रातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. (Actor Chandu Commit Sucide)

अभिनेता चंदू उर्फ ​​चंद्रकांत हा त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध होता. टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत चंदूचा समावेश होता. इतकंच नाही तर साऊथमध्ये त्याचा खूप मोठा चाहतावर्ग होता. अभिनेता चंदूने त्याची मैत्रीण पवित्रा हिचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी आत्महत्या केली. रंगारेड्डी जिल्ह्यातील नरसिम्हा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलकापूर येथील घरात चंद्रकांतचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला.

आणखी वाचा – पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जेव्हा चंदूने वारंवार फोन करुनही प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. एवढेच नाही तर पोलिसांना अभिनेत्याची सुसाईड नोटही सापडली आहे. चंद्रकांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी पवित्रा जयराम यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर त्यांनी पवित्रा यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रद्धांजली वाहिली होती. आता या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून सोशल मीडियावर सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

आणखी वाचा – वादाची ठिणगी! अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’मधून अनिल कपूर बाहेर, नाना पाटेकरांच्या भूमिकेवरही होणार परिणाम, भांडण की आणखी काही

पवित्राने तेलुगू शो ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारली होती. तर चंदूने तिचा पती विशालची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने ‘जोकली’, ‘नीली’, ‘राधा रमन’ इत्यादी शोमध्येही काम केले आहे.

Tags: Actor Chandu Commit Sucideactor chandu deathentertainmentsouth serialsouth tv actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
athiya shetty on kl rahul

नवरा के एल राहुलला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली अथिया शेट्टी, पण चेहऱ्यावर मात्र नाराजी, दोघांमध्ये नक्की काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.