बरेच असे कलाकार आहे ज्यांना प्रेक्षक न चुकता पडद्यावर पाहतात, मात्र ते खऱ्या आयुष्यात काय करतात, खऱ्या आयुष्यात ते कसे राहतात, त्याच घर कसं आहे याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायला नेहमीच आवडत. असाच एक विनोदाचा बादशाह भाऊ कदम यांच्याबद्दल जाणून घ्यायलाही प्रेक्षक उत्सुक असतात. अशातच भाऊ कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्याच्या खाजगी फोटोनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Bhau Kadam Kokan Trip)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक म्हणजे भाऊ कदम. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून भाऊ घराघरांत पोहोचला. विनोदाच्या अचूक टायमिंगने आजवर भाऊने त्याच्या प्रत्येक स्किटमधून प्रेक्षकांची मन जिंकली. भाऊची हास्यजत्रेतील हटके स्टाईल प्रेक्षकांना भावलीय. सध्या भाऊ शुटिंगमधून ब्रेक घेत त्याच्या गावी म्हणजेच कोकणातल्या घरी पोहोचला आहे. तो त्याच्या गावी कोकणात कणकवलीला आहे.
पाहा भाऊच्या कोकणातील घराची खास झलक (Bhau Kadam Kokan Trip)
गावच्या घरात निवांत बसलेला एक फोटो त्याने सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. त्याचा फोटोही त्याने चाहत्यांसोबत शेअर करत आहे. शिवाय गावी भाऊ त्याच्या भावासोबत गेला असून गावात फिरतानाचा भावासोबतचा फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. भाऊने शेअर केलेल्या त्याच्या घरातील फोटोतील घराच्या लाकडी वाशावर लिहिलेल्या वाक्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Bhau Kadam Kokan Trip)

भाऊच हे कोकणातील घर कौलारू आहे तर घराला लाकडी वासे आहेत. बैठ्या स्वरूपाचं हे घर आकर्षक दिसतंय. याच घराच्या आडव्या वाशावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. या आडव्या वाशावर ‘मनाचे मोठेपण आईच्या हाती असते’ तर दुसरं वाक्य आहे ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ भाऊंच्या घरात लिहिलेली ही दोन्ही वाक्य माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकतात.(Bhau Kadam Kokan Trip)
हे देखील वाचा – ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायची तेजश्रीची आहे इच्छा
भाऊ बऱ्याच दिवसांनी कामातून ब्रेक घेत कुटुंबासोबत कोकणातल्या घरी गेला आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून वेळात वेळ काढून भाऊ कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहे.
