प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. संघर्ष करून ती व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचतेच. असेच संघर्ष करणाऱ्या व्यक्तीने बऱ्याच संकटांना सामोरं जाऊन यश मिळवलेलं असत. अशातच सिनेविश्वातील एका व्यक्तीच नाव आवर्जून घेतलं जात ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अशोक सराफ होय. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी प्राण ओतून भूमिका करणारे मामा सगळ्यांचेच लाडके आहेत. सरळ साधी भूमिका असो, वा खलनायक असो, नायक असो वा एवढी विनोदी भूमिका असो अशोक मामांनी प्रत्येक भूमिका जगली आहे, आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सिनेविश्वात काम करणं हे अशोक मामांचं स्वप्न जरी असलं तरी वडिलांच्या इच्छेखातर सिनेसृष्टीत काम करण्याआधी अशोक मामांनी वेगळ्या क्षेतारत करिअरची सुरुवात केली. (Ashok Saraf Working Incidence)

सिनेसृष्टीत करिअर करणं हे मामांचं स्वप्न असूनही अभिनयाची आवड असणारे मामा करिअरच्या सुरुवातीला बँकेत काम करायचे. बँकेत काम करताना मामांना किती पगार होता हे फार कमी जणांना ठाऊक असेल. अशोक मामा बँकेत काम करण्यासोबतच नाटकातही काम करायचे. बँकेची नोकरी सांभाळत त्यांनी रंगमंचावर ही काम केलं. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी बँकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती त्यांनी मी बहुरूपी या पुस्तकात दिली आहे. मामा जेव्हा बँकेत काम करायचे तेव्हा त्यांना महिन्याला २३५ रुपये पगार मिळायचा.
पाहा अशोक मामांच्या पगाराबद्दल थोडक्यात (Ashok Saraf Working Incidence)
आपल्याला मिळालेल्या या पगारातील २०० रुपये ते घरी द्यायचे. उरलेल्या ३५ रुपयात ते आपला महिन्याचा खर्च भागवायचे. वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळावे यासाठी त्या ३५ रुपयांमध्येही बचत करायचे. बँकेच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये १० पैशांना पाव मिळायचा आणि १५ पैशांची पातळ भाजी मिळायची. मामा गुपचूप जाऊन ते खाऊन यायचे. हेच त्यांचं दुपारचं जेवण असायचं. त्यानंतर काही वर्षांनी अखेर मामांनी ती नोकरी सोडली आणि कायमचा अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला.(Ashok Saraf Working Incidence)
हे देखील वाचा – ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ खुद्द अशोक मामांनीच केला खुलासा
अशोक मामांच्या अनेक गोष्टी आज ऐक्याला आपल्याला आवडतायत मात्र यामागे त्यांची असलेली मेहनत थक्क करणारी आहे. हल्लीच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ही त्यांची निरागसता पाहणं रंजक ठरलं. अशोक मामांचे बरेच चाहते आहेत तसेच सिनेसृष्टीत ते बऱ्याच कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत.