बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या मोठ्या बहिणीसारखं मी त्यांना…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांना दुःख अनावर, म्हणाले, “कित्येक काळ…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 24, 2023 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf on Seema Deo Death

Ashok Saraf on Seema Deo Death

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज राहत्या घरी निधन झालं आणि संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. प्रदीर्घ काळापासून अल्झायमर या आजाराने सीमा ह्या त्रस्त होत्या. आज (२४ ऑगस्ट २०२३) रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.(Ashok Saraf on Seema Deo Death)

सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीमुळे अभिनेते अशोक सराफ देखील भावुक झालेले पाहायला मिळाले. ABP माझाशी संपर्क साधत अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सीमा देव याना श्रद्धांजली वाहत अशोक सराफ म्हणाले “अत्यंत वाईट गोष्ट झाली की, एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन नटी गेली असं मी म्हणेन. सीमा देव यांनी अभिनयाच्या या क्षेत्रात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं, त्यावर काही वादच नाही. त्यांनी अगदी पहिल्या भूमिकेपासून आपलं स्वतःचं नाव या अभिनय क्षेत्रात त्यांनी कोरून ठेवलं होतं. फार छान अभिनेत्री म्हणून मी त्यांचं वर्णन करीन. त्यांची व रमेशजींची जोडी जमली होती. तर त्यांनी कित्येक काळ मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. सीमा देव या स्वभावाने अतिशय छान व्यक्ती, मी तर त्यांना अगदी मोठ्या बहिणीसारखं मानायचो. एक चांगली अभिनेत्री आपल्यातून निघून गेली, असं निश्चित म्हणेन.(Seema Deo passes away)

हे देखील वाचा – “तीन ते चार वर्ष आजाराशी झुंज आणि…”, आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”  

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

सीमा देव व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव या जोडप्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

हे देखील वाचा – “तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?

आज दुर्दैवाने सीमा देव आणि रमेश देव हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत. पण वेळोवेळी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. अभिनयक्षेत्रामुळे ही जोडी केवळ अभिनयानेच नाही तर दोघांनीही आपल्या सदाबहार प्रेमकहाणीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. रमेश देव व सीमा देव यांच्या लग्नाला ६१ वर्ष पूर्ण झाली आहेत. या जोडप्याची प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे.

सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Pooja Sawant instagram Video

Video : "काल आपण सगळे…", चांद्रयान-३ चे चंद्रावर लँडिंग होताच पूजा सावंतने केला एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.