शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 24, 2023 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Seema Deo Died

सीमा देव यांचे निधन

Seema Deo Ramesh Deo lovestory : अनेक कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात या त्यांच्या विशिष्ट अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची प्रथा काही कुटुंबांमध्ये पिढीजात रुजत गेलेली असते. या कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे देव कुटुंब. अभिनेते रमेश देव, अभिनेत्री सीमा देव आणि अभिनेते अजिंक्य देव कुटुंबाच्या पिढ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं काम अगदी मन लावून करत आहेत. परंतु आज देव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते अजिंक्य देव यांच्या आई जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यामुळे देव कुटुंबासह संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

रमेश देव आणि सीमा देव ही जोडी खऱ्या आयुष्याप्रमाणे पडद्यावरही एकत्र झळकली होती. सीमा देव यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या उल्लेखनीय अभिनयाने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाटीवर’,’आनंद’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला होता. रमेश देव व सीमा देव ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र होती परंतु खऱ्या आयुष्यात देखील दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या निखळ प्रेमकहाणीचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय. २ फेब्रुवारी २०२२ रोजी अभिनेते रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला. तत्पूर्वी रमेश देव व सीमा देव यांची एक मुलाखत प्रेक्षकांच्या मनाला भावुक करणारी ठरली.(Seema Deo family)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या मुलाखतीमध्ये रमेश देव सीमा देव यांना म्हणाले होते “नलू ५३ वर्षे लग्नाची, त्याआधीची ४,५ वर्षे इतके वर्षे तू मला साथ देत आलीस आता माझी एक इच्छा पूर्ण कर. ९३ वर्षाचा मी आहे कधी जाईन, कधी काय होईल सांगता येत नाही. तर माझी एक अशी शेवटची इच्छा आहे कि माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा. एवढीच इच्छा आहे आणि ती तू पूर्ण कर. आपण अजरामर होऊन आलो नाही कधी ना कधी जायचंच आहे. पण मला ती इच्छा भयंकर आहे कि तुझ्या मांडीवर अखेरचा श्वास घ्यावा.” या मुलाखतीत शेवटी सीमा देव यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.(Seema Deo Ramesh Deo lovestory)

हे देखील वाचा – Seema Deo Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

‘tv ९’ मराठी या वाहिनीवरील सीमा देव व रमेश देव यांचा हा व्हिडिओ पाहून प्रेक्षक देखील भावुक झालेले पाहायला मिळाले. अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी अल्झायमर आजाराशी सुरु असणारी झुंज आज अयशस्वी ठरली. वांद्रे येथील घरी आज बरीच मंडळी सीमा देव यांच्या अंतिम दर्शनासाठी पोचली आहेत.(Seema Deo Passes Away)

Tags: seema deoseema deo deathSeema Deo Ramesh Deo lovestory
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Seema Deo Namestory

चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर सीमा देव यांनी बदललं होतं स्वतःचं नाव, पण त्यांचं खरं नाव नेमकं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.