८० च्या दशकात छोट्या पडद्यावरील रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. आजही या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजही अनेक चाहत्यांकडून या मालिकेवरील प्रेम ही तसूभरही कमी झालेले नाही. याच मालिकेत अभिनेते अरुण गोविल यांनी श्रीरामाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने अरुण गोविल यांचे आयुष्यच बदलून गेले होते. या मालिकेनंतरही अरुण गोविल यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले, परंतु त्यांना रामायणामुळे मिळालेली प्रसिद्धी ही आजही तितकीच आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे अरुण गोविल हे काहीना काही कारणांवउण कायमच चर्चेत राहत असतात, नुकत्याच पार पडलेल्या राम मंदीर प्राणप्रतिष्ठान् सोहळ्यात अरुण चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अरुण यांनी नुकतीच वाराणसीमध्ये भेट दिली होती. यावेळी त्यांनी ‘रामायण’ हे प्रत्येकासाठी जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि याचा अभ्यासक्रमात समावेश करावा. शाळा-कॉलेजातील प्रत्येक मुलाला ते शिकवले पाहिजे असं मत मांडलं आहे.
#WATCH | Varanasi, UP: Actor Arun Govil who played the role of Lord Ram in the Ramanand Sagar's Ramayan, says, "Ramayana must be included in our curriculum because there is no justification in calling Ramayana religious. Ramayana is our philosophy of life. Ramayana tells us how… pic.twitter.com/drugPoklPf
— ANI (@ANI) February 6, 2024
यावेळी अरुण गोविल यांना “सनातनी राष्ट्र किंवा हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक विद्यापीठात रामायण शिकवले जावे असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत ते असं म्हणाली की, “रामायण हे आपल्या अभ्यासक्रमात असलेच पाहिजे. रामायण हे केवळ धार्मिक नाही तर रामायण हे आपले जीवनाचे तत्वज्ञान आहे. रामायण केवळ आपल्यालाच नाही तर सर्व मानव जातीने कसे जगले पाहिजे हे सांगते”.
तसेच यापुढे ते असं म्हणाले की, “रामायण नाती कशी जपायची, लोकांनी किती संयम ठेवला पाहिजे हे शिकवते. एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात शांतता, संयम कशाप्रकारे मिळवू शकतात हे आपल्याला रामायण शिकवतं. त्यामुळे रामायण हे प्रत्येकासाठी आहे. ते फक्त सनातनी लोकांसाठी नाही. त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमात रामायण ही असलेच पाहिजे”.