महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित ‘श्री शिवराज अष्टक’ मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा ऐतिहासिक चित्रपट आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या सिंहगड किल्ल्यावरील लढाईची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर आला असून हा चित्रपट पाहण्यासाठी शिवप्रेमी व रसिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. (Chinmay Mandlekar on Subhedar movie)
मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही वेळातच चित्रपटातील अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षकांच्या या कृतीमुळे चित्रपटाची टीम नाराज आहे. चित्रपटाचे निर्माते व अभिनेता चिन्मय मांडलेकर याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने प्रेक्षकांना चित्रपटाची दृश्ये सोशल मीडियावर शेअर न करण्याची विनंती केली आहे. त्याऐवजी चित्रपटाच्या पोस्टर व तिकिटाचे फोटो काढण्याचे आवाहन केले आहे.
पाहा काय म्हणाला चिन्मय मांडलेकर ? (Chinmay Mandlekar on Subhedar movie)
चिन्मय मांडलेकर या व्हिडिओमध्ये म्हणाला, “आज ‘शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला अगदी पहिल्या शोपासून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या आणि रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, एका गोष्टीसाठी सर्वांना मी विशेष आवाहन करतो, की चित्रपट पाहताना आपल्यातील अनेक जण पडद्यावर सुरु असलेला चित्रपट आपल्या मोबाईलवर शूट करत आहे, आणि ते दृश्य सोशल मीडियावर अपलोड करत आहे. तर कृपया हे असं करू नका.”
हे देखील वाचा – “आम्हाला अशी वागणूक…”, काम करुनही पैसे न दिल्याने गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “लोक असं वागतात तेव्हा…”
“पडद्यावर चित्रपट सुरु असताना ते मोबाईलवर शूट करणं हा कायदेशीरित्यासुद्धा गुन्हा आहे. आपल्या महाराजांचा चित्रपट बघण्याचा आनंद जो आपण चित्रपटगृहात घेतोय, तो इतर बंधू-भगिनींनासुद्धा घेता यायला हवा. म्हणून, आपण सर्वांनी चित्रपटातील दृश्याचे शूटिंग करून ते सोशल मीडियावर टाकू नका. त्याऐवजी आपण चित्रपटाच्या पोस्टरसमोर स्वतःचे सेल्फी, तिकिटांचे फोटो टाका. मात्र चित्रपटातील दृश्य खासकरून चित्रपटाचा शेवट मोबाईलमध्ये कैद करून ते अपलोड करणं टाळा.”, असे आवाहन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
हे देखील वाचा – गौरव मोरेच्या हाती मोठा मराठी चित्रपट, प्रसाद ओकबरोबर काम करताना दिसणार, म्हणाला, “लवकरच…”
त्याचबरोबर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीही चित्रपटातील दृश्ये सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर हे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे आदी प्रमुख भूमिकेत आहेत. (Chinmay Mandlekar appeals to dont share Subhedar movie clip)