अजय देवगण गेला अनेक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.दिलवाले, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गोलमाल, सिंघम, द्रिश्यम असे अनेक गाजलेले चित्रपट अजय देवगणने आजवर केले आहेत. अजय देवगण हे नाव ऐकल्यावर ही एक भारदस्त व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येत. सिंघम प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतला की पोलीस, रावडी भूमिकेसाठी हे एकच नाव तोंडावर येत.(Ajay Devgan New Movie)
पहा कोणता नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Ajay Devgan New Movie)
‘द्रिश्यम’ आणि ‘कैथी’ या चित्रपटांनंतर अजय लवकरच एका नवीन चित्रपटात दिसणार आहे, गुजराती चित्रपट ‘वश’ याच हिंदी रिमेक घेऊन अजय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.गुजराती मध्ये या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, आणि अजय या चित्रपटाचा रिमेक घेऊन येणार म्हंटल्यावर अपेक्षा नक्कीच वाढतात.याच सोबत अजून एक खास गोष्ट आहे ती म्हणजे अभिनेता आर माधवन देखील या चित्रपटात अजय देवगण सोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
दोन अफलातून कलाकरांना एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी बोनसच आहे. या चित्रपटाचं हिंदी नाव अजून ठरलेलं नाही. क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल या वशच्या हिंदी रिमेकच दिग्दर्शन करणार आहेत. इतर कलाकार बाकीच्या तांत्रिक गोष्ट मॅनेज करून, जून महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरु करणार आहे.(Ajay Devgan New Movie)
हे देखील वाचा : एका प्रेताशेजारी झोपून पियुष यांनी काढली होती एक रात्र
अजय आणि आर माधवन ही जोडी काय धमाल करणार याची उत्सुकता आता वाढत चाली आहे, चित्रपटाचं नाव, कथानक, ऍक्शन,काय काय या चित्रपटात पाहायला मिळेल याचा उलगडा हळूहळू होईल. बॉक्सऑफिसवर सिनेमा किती तग धरेल हे बघणं रंजक ठरेल.