सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरु असून बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नवे लक्ष्य’ने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं.या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या डॅशिंग अंदाजाने चाहत्यांना आपलंस केलं होतं. तर या मालिकेत इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा देखील प्रेक्षकांचा आवडता आहे.अभिजीतने नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.(Abhijeet Shwetachandra)
अभिजीत हा ऑन स्क्रीनप्रमाणेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील खास क्षण आणि कामासंबंधीचे खास अपडेट चाहत्यांसोबत शेअर करतो. काही दिवसांपूर्वी अभिजीतचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला. आणि आता तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.अभिजीत आणि सेजल यांना हळद लागली असून त्यांच्या हळदीचे रोमँटिक फोटो समोर आले.नुकतंच अभिजीतने देखील हळदीचा खास व्हिडीओ शेअर केला. यात सेजल आणि अभिजीत हे दोघेही खूप आंनदी दिसून येतात.
तर या रोमँटिक फोटो आणि व्हिडिओवर चाहते चांगलेच भाळले आहेत ,आता चाहते या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी आतुर झालेत.अभिजीत मॉडेल आणि युट्युबर असलेल्या सेजल वारडे सोबत लग्नगाठ बांधणार आहे.सेजल एक युट्यूबर असून ती एका साडी ब्रॅण्डची मालकीण देखील आहे.अभिजीत आणि सेजल यांचा साखरपुडा ११ जून रोजी पार पडला.
अभिजीतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत ही माहिती दिली होती.तेव्हापासून हे कपल लग्नबंधनात कधी अडकणार याची चर्चा रंगली होती. तर त्यांचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरले असून या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी अभिजीतला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(Abhijeet Shwetachandra)
====
हे देखील वाचा – ‘इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला…’ तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत
====
अभिजित हा सध्या शुभविवाह या मालिकेत अभिजीत हे पात्र साकारताना दिसतो. तर त्याची हि भूमिका देखील चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरते.तर या आधीदेखील अभिनीतने साजणा, बाजी या
मालिकांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.