बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’च्या टीमची मंगळागौर, ‘नाच गं घुमा’ म्हणत प्रेक्षकांनाही नाचवलं, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 21, 2023 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Baipan Bhari Deva team in India's Best Dancer Show

Video : 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या मंचावर 'बाईपण भारी देवा'च्या टीमची मंगळागौर, 'नाच गं घुमा' म्हणत प्रेक्षकांनाही नाचवलं, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रासह देश-विदेशात केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केला आहे. केवळ मराठी प्रेक्षकांनी नव्हे, तर हिंदी भाषिक प्रेक्षक, समीक्षक व बॉलीवूड कलाकारांनीही केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले आहे. अशातच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टीमने नुकतीच प्रसिद्ध हिंदी रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये हजेरी लावली होती. दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब हे कलाकार मंचावर आले होते. यावेळी शोची परीक्षक व मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. (Baipan Bhari Deva team in India’s Best Dancer Show)

या शोचा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून ज्यात शोचे परीक्षक ‘बाईपण भारी देवा’च्या गाण्याने टीमचे स्वागत करतात. पुढे चित्रपटातील अभिनेत्री उपस्थितांसमोर पारंपरिक मंगळागौरीचा खेळ सादर करताना दिसल्या. त्यांचा हा खेळ पाहून अभिनेत्री सोनाली बेंद्रे व मंचावरील प्रेक्षकांना मंगळागौरीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरला नाही.

हे देखील वाचा – “हा निर्लज्जपणा येतो कुठून?”, रीलसाठी कवितांचा वापर करणाऱ्यांवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “त्याचीच कविता…

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे कलाकारांचे कौतुक केले आहे. एक नेटकरी यावर म्हणतो, “मराठी पाऊल पडते पुढे, तुमचा अभिमान वाटतोय”. तर आणखी एका नेटकऱ्याने “सुकन्या ताई तुम्हाला मिस केलं या डान्समध्ये”, अशी कमेंट केली आहे.

हे देखील वाचा – धमाल-मस्ती, चेहऱ्यावरील आनंद अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या मुलांचा पहिला परदेश दौरा, अभिनेता व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

याआधी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवत चित्रपटाचे व कलाकारांचे भरभरून कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने आतापर्यंत आतापर्यंत ७५ कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाची घोडदौड सुरु असून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Baipan Bhari Deva team in India’s Best Dancer Show)

Tags: baipan bhari deva movieindia's best dancerkedar shindesonali bendre
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Arun Kadam welcomes his grandson

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमांनी केले नातवाचे जल्लोषात स्वागत, फोटो आले समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.