मराठी सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांचा प्रवास हा ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे खऱ्या अर्थाने सुरु झाला. अनेक कलाकारांना या रिऍलिटी शोने सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान मिळवून दिलं. असाच एक मराठमोळा अभिनेता ज्याचं ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे आयुष्यचं बदललं तो म्हणजे अक्षय केळकर. ‘बिग बॉस सिझन ४’च्या विजेतेपदावर अक्षयने नाव कोरलं. यानंतर अक्षय काही थांबलाच नाही. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अक्षयने सिनेसृष्टीत बरंच काम केलं. (Akshay Kelkar House)
सध्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून अक्षय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. अभिनयाबरोबरचं अक्षय सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच अक्षयने त्याच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाचाही खुलासा केला. अक्षयने त्याच्या स्वप्नातील हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावरुन या घराचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
आणखी वाचा – Video : आजारी असूनही सीन शूट करत आहे लीला, हातात छोटा पंखा घेऊन बसली आणि…; bts व्हायरल
अक्षयने मुंबईत स्वत:च घर घेतलं आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने ही आनंदाची बातमी दिली होती. व्हिडीओमध्ये अक्षयच्या नवीन घराची झलकही पाहायला मिळाली. अशातच अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये अक्षयने त्याच्या घरातील सुंदर अशा विठुरायाच्या मूर्तीचे दर्शन घडवले आहे.
“ही माझ्या घराची खिडकी. इथून ऊन दिसतं, वारा दिसतो, पाऊस दिसतो. इथून आकाश दिसतं. आकाशात असंख्य स्वप्नही दिसतात आणि पाठीशी तू आहेस. राम कृष्ण हरी”, असं कॅप्शन देत अक्षयने त्याच्या घरातील विठुरायाचे दर्शन दिले आहे. सध्या विठुरायाच्या वारीत भक्त तल्लीन झालेले असताना अक्षयच्या घरातील या सुंदर असा मूर्तीने विठ्ठलाचे दर्शन गाढविले आहे. कलाकार मंडळींनीही कमेंट करत विठुरायाच्या मूर्तीचे कौतुक केले आहे.