Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळतात. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांनी ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. तर अशातच मालिकेत आलेलं एक रंजक वळण काहींना ते आवडलेले दिसत नाहीये. सध्या मालिकेत अनुष्काच्या एंट्रीचा प्रोमो पाहायला मिळतोय. अनुष्का हे नव वादळ आता किर्लोस्करांच्या घरात शिरलेलं आहे. मात्र याची भनकही तिने इतर कोणालाही लागू दिलेली नाही. त्यामुळे किर्लोस्कर या अनुष्काच्या खऱ्या रुपापासून वंचित असलेले पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर किर्लोस्करांची मोठी सून म्हणून अनुष्काचं नावही अहिल्यादेवींनी घेतलेलं आहे. त्यामुळे आता किलोस्करांची सून होण्यापर्यंत अनुष्काचा प्रवास सुरु झालेला पाहायला मिळतोय.
मालिकेत एकीकडे किर्लोस्करांची सून होण्याचा मान अनुष्काने पटकावलेला असतो. तर तिला आदित्यच्याही मनात जागा करायला सुरुवात केलेली असते. अहिल्यादेवींनी अनुष्काला सून म्हणून स्वीकारलं असल्याने आदित्यही आईने निवडलेल्या मुलीबरोबर लग्नासाठी तयार होतो. आणि तो अनुष्काचा स्वीकार करतो. इतकंच नव्हेतर अनुष्काही आदित्यला प्रपोज करतानाही दिसते. यामुळे पारूचा हिरमोड होतो. पारू खूप नाराज होते. अस्वस्थ होते, हे सगळं कसं थांबवायचं हे पारूला कळता कळत नाही. ती सगळ्या गोष्टी नशिबावर सोडते. आता आदित्य पासून पारू कायमची दूर जाणार का?, की अनुष्काचं सत्य उघडकीस आणून पारू आदित्यचे आणि किर्लोस्कर कुटुंबाचे डोळे उघडणार याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
आणखी वाचा – धक्कादायक! विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला कायमचा निरोप, अभिनय सोडणार, म्हणाला, “गेले काही दिवस…”
तर मालिकेत असं पाहायला मिळालं की, अनुष्का ही खऱ्या अर्थानं दिशाची बहीण असते आणि बहिणीचा झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्कर यांच्या घरात शिरलेली असते. दिशाच्या सांगण्यानुसार अनुष्का वागत असते आणि ती सर्वात आधी पारूचा नाश करणार असल्याचं समोर आलंय. दिशानेही आधी पारूला बाजूला काढ असं म्हणत अनुष्कावर बाण सोडला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, घरात आढळला मृतदेह
आता अनुष्का दिशासाठी पारूचा कसा बदला घेणार?, अनुष्का दिशासाठी किर्लोस्कर घराचा कसा नाश करणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हेतर आता अनुष्काचा हा खरा चेहरा पारू सगळ्यांसमोर आणू शकेल का?, पारूला अनुष्काचं सत्य समजणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.