शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांची इफ्तार पार्टी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 6, 2024 | 9:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Khandkekar shared iftar party photos and videos from the set of Tuzech Mi Geet Gaat Aahe

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांची इफ्तार पार्टी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या रमजाननिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. रमजान पर्वात बहुसंख्य मुस्लीम बांधव उपवास (रोजे) करतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. अशातच मराठी मालिका विश्वातील एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवरदेखील अशाच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून याचे काही खास क्षण कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकाने व शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यातच बाप-लेकीच्या नात्याबद्दल आणि आईचा शोध घेण्यासाठी मुलीच्या भाबड्या प्रयत्नांभोवती मालिकेचे कथानक गुंफले आहे. मालिकेतील रोज नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका कायमच चर्चेत राहत असते. अशातच मालिकेच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – स्कर्ट, टॉप अन्…; साडी, नथ नव्हे तर प्रथमेश लघाटेने बायकोचे वेस्टर्न लूकमधील फोटो केले शेअर, मुग्धाच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा

रमजाननिमित्त सध्या सर्वत्र इफ्तार पाटीचे आयोजन केले जात आहे आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या सेटवरदेखील इफ्तार पार्टीचे खास आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत मालिकेच्या पड्यावरील कलाकारांसह पडद्यामागील काही कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. मालिकेच्या कलाकारांकडून या पार्टीचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज सिंह व तूळ राशीसह ‘या’ पाच राशीवर असणार शनिदेवाची कृपा, तर ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार व्यवसायात यश, जाणून घ्या…    

मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर, अवनी तायवाडे यासंह सर्व कलाकारांनी या पार्टीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ज्याप्रमाणे दिवाळी, गणपती, होळी आदी सण साजरे करुन सामाजिक एकता जपली जाते. त्याचप्रमाणे सेटवर इफ्तार पार्टीचे आयोजन करुन मालिकेच्या कलाकारांनी व तंत्रज्ञ मंडळींनी दाखवलेल्या या ‘सर्व-धर्म-समभाव’बद्दल सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Tags: abhijeet khandkekarTuzech Mi Geet Gaat Aahe
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Tushar and Swati Deval have started their own hotel in Mumbai photo viral on social media

सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले "मोठी गुंतवणूक आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.