शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी माफी मागते पण…”, फसवणूकीनंतर इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण प्रकरण सांगताच आर्या आंबेकरवर भडकले नेटकरी, गायिका म्हणाली, “भावना दुखावल्या तरीही…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 13, 2023 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aarya ambekar apologized for not making the video in marathi and wrote post explaining the reason for speaking in english

"मी माफी मागते पण…", फसवणूकीनंतर इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण प्रकरण सांगताच आर्या आंबेकरवर भडकले नेटकरी, गायिका म्हणाली, "भावना दुखावल्या तरीही…"

आपल्या मनमोहक सौंदर्याने व सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचली व लोकप्रिय झाली. तिने आजवर अनेक गाण्यांसाठी पार्श्वगायन करत प्रेक्षकांच्या मनावर तिच्या आवाजाची छाप पाडली आहे. आर्याच्या गाण्यांची जितकी चर्चा होते. तितकीच ती तिच्या मनमोहक सौंदर्यानेदेखील चर्चेत असते. आर्या तिच्या सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते त्याचबरोबरबर गाण्याचे काही व्हिडीओही शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.

नुकतंच आर्याने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर करत तिच्याबरोबर झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितले होते. तिच्या लाईव्ह गाण्याच्या कार्यक्रमात तिने गेलेले गाणी काही युट्यूब चॅनेल्सनी स्वत:च्या वाहिनीवर पोस्ट केली आणि या सगळ्याचा मनस्ताप व्यक्त करत आर्याने व्हिडीओ पोस्ट केला होता. “मी माझ्या कॉन्सर्टमध्ये गायलेल्या काही गाण्यांचे व्हिडीओ लोकांनी त्यांच्या युट्यूबवर पोस्ट केले. त्या व्हिडीओमधून माझा आवाज वेगळा करून ‘लेटेस्ट मराठी कीर्तन’ नावाच्या एका म्युजिक लेबलने अनेक गाण्याच्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या स्वतःच्या कॉपीराइटसकट आपलोड केले आणि हे सगळ माझ्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाला “खूप वाट पाहत आहे…”

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी तिच्याबरोबर झालेल्या या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी तिला यासाठी पाठिंबा दिला आहे. पण आर्याने हा व्हिडीओ इंग्रजी भाषेत केल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोलदेखील केले. मराठी गाणी म्हणता पण व्हिडीओ इंग्रजीत का केला असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली. यावर तिने एक पोस्टद्वारे भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे, “मी मराठीमध्ये बोलले नाही म्हणून जे लोक नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना मला एक सांगावसं वाटत आहे की, मला तुमच्या भावना कळत आहेत. पण माझ्याबरोबर झालेली ही फसवणूक इतर भाषेतील कुठल्याच गायकांबरोबर व्हायला नको असं मला मनापासून वाटतं आणि त्यासाठीच सगळ्यांना कळेल अशा इंग्रजी भाषेत मी व्हिडीओ केला आहे. प्रत्येक म्युजिशियनला अशा प्रकरणांपासून सतर्क करणे हा या व्हिडीओचा मुख्य उद्देश आहे. तरीही तुमच्या भावना दुखावल्यामुळे मी माफी मागते. पण तुम्हीसुद्धा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेतलत तर मला बरं वाटेल.”

आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मला मदत केलेल्या सर्वांनाचं तिने धन्यवाद म्हटले आहे. तसेच नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी तिच्या याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच भाषेवरून कमेंट करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.

Tags: aarya ambekarentertainment newsentertainment updatemarathi actressMarathi newsmarathi singer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Marathi Actor Ravindra Berde Died at 78

Ravindra Berde Passed Away : शेवटच्या दिवसांमध्ये अशा परिस्थितीमध्ये होते रवींद्र बेर्डे, ओळखणंही झालं होतं कठीण, स्वानंदी बेर्डेने फोटो शेअर करत दाखवलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.