Aarti Solanki Video : लोकप्रिय अभिनेत्री आरती सोळंकीने आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध धाटणीच्या भूमिकांमध्ये उत्तम काम करत प्रेक्षकांची मने ती नेहमीच जिंकत आली. केवळ विनोदी कार्यक्रमातच नव्हे, तर ‘बिग बॉस’, ‘झुंज मराठमोळी’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली. ज्यात तिच्या या खेळीने सर्वांनाच अचंबित केलं. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून दूर असलेली आरती तिच्या ‘फॅट टू फिट’ जर्नीमुळे बरीच चर्चेत आलेली आहे. ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात नुकतीच आरतीने हजेरी लावली होती. यावेळी तिने कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. (Aarti Solanki talks about on Swami Samarth)
अभिनेत्री आरती सोळंकीची स्वामी समर्थ महाराजांवर मोठी श्रद्धा असून तिच्या आयुष्यातील या चढ-उतारात अनेकदा याची प्रचिती आल्याचं तिने सांगितलं आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझं आणि स्वामीं समर्थांचं खूप वेगळं नातं आहे. असं म्हणतात की, समोरच्यांचं बघून किंवा ऐकून आपण कळत-नकळतपणे त्या मार्गाला लागतो. तेच माझ्या बाबतीत झालं. मी त्यांच्याकडे गेले नाही, तर ते माझ्याकडे आले. त्यामुळे हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता, जे मी आजपर्यंत कुठेही सांगितलं नाही. बरेच जण मला म्हणतात की, तू स्वामींना मानते. तर हो, मी स्वामींना मानते. पण मी स्वामींचं फार काही करत नाही. पण एक आहे, मी जेव्हा सोलापूरला माझ्या गावी जाते तेव्हा मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठाकडे गेल्याशिवाय परत येत नाही. किंवा एखादा प्रोजेक्ट मला मिळाला, तर स्वामींची भेट घेते आणि त्या प्रोजेक्टला सुरुवात करते.”
स्वामींच्या प्रचितीबद्दल बोलताना ती म्हणाली, “एके दिवशी मला या गोष्टीची प्रचिती आली. तेव्हा मी याचा शोध घेण्याचं ठरवलं होता. ही गोष्ट माझ्या आईला जेव्हा सांगितली. तेव्हा ती म्हणाली की, तू जे काही सांगतेस, ते आपले अक्कलकोटला स्वामी समर्थ म्हणून आहे, तेच बहुतेक असतील. तर माझ्या घराशेजारी एक व्यक्ती होते, ते स्वामींचे मोठे भक्त होते. त्यांच्या घरी जाऊन तो फोटो पाहिला अन् धावत माझ्या घरी आले. आणि आईला सांगितलं, असेच दिसत होते ते. पुढे मी त्या मठात गेले आणि मला जो काही अनुभव आला, ते शब्दात सांगू शकत नाही. मात्र मी तिथेच म्हटलं की नाही, ही खूप मोठी शक्ती आहे.”
हे देखील वाचा – Video : …अन् ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सेटवरच गायली अंगाई, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “सूर नीट लागो ना लागो…”
आरती ‘ई टीव्ही’वरील ‘झुंज मराठमोळी’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्या कार्यक्रमाच्या शूटदरम्यान आलेला दैवी चमत्काराबद्दल सांगताना ती म्हणाली, “मी ‘झुंज मराठमोळी’ नावाचा कार्यक्रम करत होते. त्यात तीनचाकी सायकल चालवण्याचा टास्क होता. तर त्यावेळेस मला दोघं सहकाऱ्यांनी त्या तीनचाकी सायकलवर बसवलं होतं. तेव्हा सर्वांनाच वाटलं होतं, तिला यामध्ये काही यश मिळणार नाही. कारण त्या सायकलवर माझा पायच पुरत नव्हता. मी फक्त एवढंच बोलले होते, ‘स्वामी मला सायकल चालवता येत नाही. जी काय चालवायची आहे ती तुम्हाला चालवायची आहे.’ पुढे मी ती सायकल कुठेही न थांबवता बरोबर नेलेली होती. त्यावेळी मलाही कळतही नव्हतं की नक्की काय होत आहे? ही सायकल कशी पुढे जाते?”
हे देखील वाचा – “श्वसनाचा त्रास…”, वाढतं प्रदूषण पाहता भडकली केतकी माटेगावकर, महापालिकेला केली विनंती, म्हणाली, “प्रचंड त्रास होतो कारण…”
“जी मुलगी कधीही सायकलवर बसली नाही, ती मुलगी तीनचाकी सायकल चालवत होती. विक्रम गायकवाड व पराग कान्हेरे यांना सोडून इतर सहकाऱ्यांना मात्र ती सायकल चालवता आली नाही. पुढे हा टास्क झाला आणि ब्रेकनंतर माईक दादा माझ्याजवळ आले. त्यावेळी ते मला म्हणाले की, तुम्ही स्वामींना खूप मानतात का? मी त्यावर हो बोलली. आणि पुढे ते म्हणाले, ‘मग ही सायकल स्वामिनीच चालवली, तुम्ही काय बोललात ते मी ऐकलंय.” तर पुढचा एक किस्सा सांगताना ती म्हणाली, लॉकडाऊनच्या आधी माझ्या हातून धर्मा प्रोडक्शनचा एक चित्रपट सुटला. पुढे लॉकडाऊन सुरु झाला, तेव्हा मी माझ्या खात्यातील बॅलन्स चेक करताना बघितलं, तर केवळ ११ हजार रुपये माझ्याकडे शिल्लक होते. मी विचार केला की, आता कसं होईल माझं. पण नशिबाने मला कॉमेडी बिमेडी मिळाली आणि सर्व सुरळीत सुरु झाल्याचं ती यावेळी म्हणाली.