शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानचा लेक जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, साई पल्लवीसह रोमान्स करताना दिसला अन्…; सेटवरील फोटो आले समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 13, 2024 | 12:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
junaid khan bollywood first movie

आमिर खानचा लेक जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, साई पल्लवीसह रोमान्स करताना दिसला अन्…; सेटवरील फोटो आले समोर

बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याची लेक आयरा खानच्या लग्नामध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळाला. यानंतर आता आमिर खानच्या मुलाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमधून तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसह दिसून येत आहे. जुनैद हा ‘महाराज’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार असून २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच जुनैदच्या दुसऱ्या चित्रपटाची देखील चर्चा सुरु आहे. (junaid khan bollywood first movie)

आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सिद्धार्थ पी मल्होत्रा व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘महाराज’ या चित्रपटाची निर्मिती होत असून या चित्रपटाचा सेट जपान येथील साप्पोरो स्नो फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आला आहे. या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी देखील दिसत आहे. या चित्रपटामध्ये जुनैद व साई पल्लवी आपल्याला रोमान्स करताना दिसणार आहेत.

आणखी वाचा-माधुरी दीक्षितच्या गाण्यावर ऐश्वर्या नारकर थिरकल्या, व्हिडीओ पाहून नवऱ्यानेही केलं कौतुक; नेटकरी म्हणाले, “हावभाव…”

या चित्रपटाचे चित्रीकरण १ डिसेंबरपासून सुरु झाले असून या चित्रपटाचा काही भाग मुंबईमध्ये चित्रित करण्यात आला आहे. जपानमध्ये सध्या ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे त्या ठिकाणी बर्फ पडत असल्याने चित्रीकरण लांबणीवर पडले आहे. जुनैद व साई पल्लवी ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाबद्दल उत्सुकता देखील दर्शवली जात आहे.

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातूनही त्रास, अभिनेत्रीने घेतली दिल्ली पोलिसांत धाव, म्हणाली, “तो मला…”

जुनैद खानचा हा पहिला चित्रपट असून हा चित्रपट ऐतिहासिक महाकाव्यावर बेतलेला असल्याचे समोर आलं आहे. जुनैदने या आधी ७ वर्ष रंगभूमीवर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बॉलिवूडमध्ये जुनैदच्या नावाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून तो नावारूपास येईल असा विश्वास अनेकांना आहे. पण आपल्या अभिनयाने जुनैद प्रेक्षकांची मने जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: aamir khan sonBollywood debutBollywood first flimfisrt flimJunaid khanmaharaj moviesai pallavi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Rashami Desai Casting Couch

"बी-ग्रेड चित्रपट, ड्रिंकमध्ये मादक पदार्थ अन्…", रश्मी देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "विषही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.