बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये गैरसमज वाढला, नात्यामध्ये त्या व्यक्तीमुळे संशय, भुवनेश्वरीला आनंद

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update

त्या’ पत्रामुळे अधिपती-अक्षरा यांच्यातला गैरसमज आणखी वाढले, नात्यात दुरावा येणार?

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो आणि अक्षरा घर सोडून निघून जाते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अक्षरा-अधिपती यांच्यात अबोला आहे आणि हा अबोला कमी होण्याऐवजी आणखीच वाढताना दिसत आहे. अशातच मालिकेत नुकतीच अक्षराच्या परदेशातील मित्राची एन्ट्री झाली. या मित्रामुळे अधिपती व अक्षरा यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकताच हा सीक्वेन्स पाहायला मिळाला. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)

नुकत्याच झालेल्या भागात  अक्षराने मॅकच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतानाच तिथे नेमका अधिपती येतो आणि त्या दोघांना एकत्र बघून अधिपतीच्या मनात त्यांच्याविषयी गैरमसज निर्माण होतो. यामुळे अक्षरा आपली फसवणूक करत आहे या विचाराने अधिपतीचे डोळे पाणवतात. अशातच आता दोघांमधील नात्यात आणखी दुरावा येणार आहे. मालिकेच्या आगामी कथानकाशी संबंधित एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – स्वानंदी टिकेकरने नवऱ्याच्या साथीने घेतलं नवं हक्काचं घर, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये एकीकडे अक्षराची बहीण इराला तिच्या नावाने पत्र आल्याचे सांगते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीसाठी पत्र आल्याचे सांगते. पुढे दोघे ही पत्र उघडतात तेव्हा अक्षराच्या हातात असलेल्या पत्रात अधिपतीने असं लिहिलेलं असतं की, “आम्ही तुमच्यासही घाई गडबडीत लग्न केलं तेव्हा असं वाटलं होतं की संसार कराल पण तुम्ही संसाराची शाळा केली”. तर अक्षराच्या पत्रात आता आपण संसार करु शकतो हे मला वाटत नाही” असं लिहिलेलं असतं.  

आणखी वाचा – बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा

अधिपती व अक्षरा यांना हे पत्र वाचून मोठा धक्का बसल्याचं या प्रोमोमधून दिसटत आहे. त्यामुळे आता दोघांना आलेली ही पत्रे नेमकी कुणी पाठवली आहेत?, या पत्रामुळे अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय बदल होणार? दोघांमधील गैरसमज दूर करण्यात ते यशस्वी होणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका कोणतं नवीन वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.    

Tags: marathi tv serialtula shikvin changlach dhadatula shikvin changlach dhada serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Rakesh Roshan On Hrithik- Sussanne Divorce

"त्यांच्यातील गैरसमज त्यांना सोडवता आला नाही", ऋतिक रोशनच्या घटस्फोटावर वडिलांचं भाष्य, म्हणाले, "ती आजही आमच्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.