आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेतील रंजक वळणामुळे मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतंच मालिकेत अरुंधतीचं दुसरं लग्न थाटामाटात पार पडलं. तर या मालिकेत आशुतोषसोबत अरुंधतीने संसार थाटला आहे,तरीही अरुंधती तिच्या मुलांची जबाबदारी चोख पार पडताना दिसते. आता तिच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असताना तिच्यासमोर मात्र नवं संकट उभं राहिलं. एकीकडे यश आणि गौरी यांचं नातं तुटलं तर दुसरीकडे इशा आता एक मोठं पाऊल उचलणार आहे.(Isha Anish)
नुकतंच मालिकेत गौरीने यशबद्दल मोठा निर्णय घेतला. ती त्याला सोडून कायमची निघून गेली. त्यामुळे यश खूपच खचला. अरुंधती यशला सध्या यासर्वातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय.यातच आता तिच्या समोर नवीन संकट उभं राहतंय. अरुंधतीची लेक ही तिच्या भविष्यासाठी काही निर्णय घेत आहे.
ईशाने काय घेतला निर्णय?
मालिकेत सध्या अनिश-ईशा यांच्यातील प्रेम पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. अरुंधती आणि आशुतोषने देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. पण सध्या यशाने उचललेल्या पाऊलामुळे अरुंधती ही ईश्वर नाराज झाली. गुढीपाड्वाच्या दिवशी ईशा घरी खोटंबोलून अनिशला भेटायला गेली. अरुंधती आणि आशुतोषने ईशाला अनिसच्या मिठीत पाहिलं. पण त्यावेळी अरुंधतीचा राग अनावर झाला.स्पष्टीकरण देण्याचा दोघेही प्रयत्न करत असतात. पण अरुंधती त्यांना थांबवते आणि ईशाला सुनावते. ‘हे काय आहे ईशा? असं अरुंधती विचारते. मैत्रिणीकडं जाणार होतीस ना, अन् इथे आलीस. पण यावर ईशा म्हणते की, आम्ही काय चुकीचं केलं नाहीये. यावर अरुंधती म्हणाली की, चुक काय बरोबर आहे, हा मुद्दा नाहीये.
तुमच्या नात्याचं काय होणार आहे माहिती नसताना तुम्ही एकातांत असं…हे मला अजिबात पटत नाहीये. तुला सगळी परिस्थिती माहिती आहे ईशा. तुमच्या नात्याला विरोध होणार आहे हे कळतंय. यातून तुम्ही मार्ग काठू शकणार आहात की नाही, हे तुम्हाला माहितच नाहीये. हे असं असताना का स्वत:वर ताबा ठेऊ शकत नाही आहात.अजून कशात काही नसताना, तुम्ही एकमेकांच्या इतके जवळ येताय, याला काय योग्य म्हणायचं का?असं म्हणत अरुंधती ईशाला घरी जाण्यास सांगते. तसंच पुन्हा अनिशला एकट्यानं भेटायचं नाही, असं देखील सांगते. तेव्हा ईशा निघून जाते.(Isha Anish)
तर नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ईशा आणि अनिष येणाऱ्या काळात त्यांच्या भविष्याविषयी मोठा निर्णय घेणार आहेत. इथे राहिलं तर अनिशची तिचं लग्न कधीच होणार नाही असं तिला वाटतंय. ती अनिषला म्हणते कि, ‘तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. इथे राहिलो तर आपलं लग्न कधीच होऊ शकत नाही. आपण पळून जाऊन लग्न करूया.’ तर आता अनिश ईशा हे पळून लग्न करणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडलाय पण याची चाहूल अरुंधतीला लागलीय हे देखील समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.(Isha Anish)
तर आता नेमकं पुढे काय घडणार अरुंधती ही ईशाची समजूत कशी काढणार?,ईशा-अनिश पळून लग्न करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
