शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचे लगीनघाई, थाटात पार पडला मेहंदी सोहळा, लवकरच अडकणार विवाहबंधनात

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aai kuthe kay karte serial fame Kaumudi Walokar shared special photos of her mehndi ceremony

आई कुठे काय करते फेम कौमुदी वलोकरच्या हातावर सजली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी,

मराठी कलाविश्वात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत, काही दिवसांपूर्वी  रेश्मा शिंदे, किरण गायकवाड आणि शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता लवकरच एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते मालिकेतील आरोही, अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Kaumudi Valokar mehndi ceremony)

नुकतंच तिचं ग्रहमख पार पडलं. त्यानंतर आता तिच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी रंगली आहे. कौमुदीच्या मेहंदी सोहळ्याला आता सुरुवात झाली असून, याची लहानशी झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने हाताला मेहंदी लागल्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. त्यामुळे आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अकडणार आहेत.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नुकतंच या मालिकेतील कलाकारांनी तिचं केळवण साजरं केलं होतं. मालिका संपल्यानंतर लग्नाआधी ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांनी तिच्या केळवणाचा थाट केला होता. अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव, अश्विनी महांगडे व सुमित ठाकरे या कलाकारांनी कौमुदीचं केळवणं केलं होतं. याचे फोटो शेअर करत कौमुदीने खास पोस्टही लिहिली होती. त्यानंतर आता तिच्या हाताला मेहंदी लागली आहे.

आणखी वाचा – अखेर अर्जुनने दिली प्रेमाची कबुली, एसटी स्टँडवर जाहीर घोषणा केली अन्…; प्रोमो व्हायरल

दरम्यान, कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच सात फेरे घेत संसार थाटणार आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.

Tags: Kaumudi Valokar mehndi ceremonykaumudi walokarkaumudi walokar aai kuthe kay karte
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
05 December 2024 daily horoscope Taurus, Gemini with Sagittarius likely to get good news on Wednesday, how is the day for you

25 December Horoscope : वृषभ, मिथुनसह धनु राशीच्या लोकांना बुधवारी खुशखबर मिळण्याची शक्यता, तुमच्यासाठी दिवस कसा? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.