बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये येण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जण आपपल्या क्षेत्रात मेहनत करत असतात आणि या मेहनतीची दखल घेत काहींना बिग बॉसमध्ये येण्यासाठी विचारले जाते. मात्र या शोमध्ये सहभागी झालेला एक स्पर्धक आहे ज्याने या शोमध्ये येण्यासाठी चक्क काली जादू केली होती आणि याचा खुलासा त्या स्पर्धकाने स्वत:च केला आहे. हा स्पर्धक म्हणजे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू. ‘बिग बॉस १४’मध्ये जान स्पर्धक म्हणून सर्वांच्या भेटीस आला होता. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने ‘बिग बॉस’मध्ये काळी जादू करुन आलो होतो…’ असं वक्तव्य जान कुमार याने केलं होतं. (jaan kumar sanu black magic)
बिग बॉस १३ मध्ये दिसलेला पारस छाबरा आता स्वतःचा पॉडकास्ट चालवतो. या शोमध्ये तो बिग बॉसमध्ये दिसलेल्या स्पर्धकांसोबत पॉडकास्ट करतो. लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याच्याशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी जान कुमार सानूने एक धक्कादायक खुलासा केला होता. पारस छाब्रा यांनी जान कुमार सानूला विचारले होते की, जेव्हा तू ‘बिग बॉस’मध्ये आला होतास तेव्हा तू नेपो किड म्हणून आला होतास की कलर्सने तुला ओळखले होते? त्यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला.
याबद्दल बोलताना जान असं म्हणाला होता की, “मी बंगालचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये काळी जादू करुन आलो आहे. मी खरं सांगत आहे. मी कलकत्त्याला गेलो आणि तिथे एका महिलेला भेटलो… तिला भेटलो तेव्हा तिने अनेक माकडं पाळल्याचं चित्र मला दिसलं. मी तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा कळलं ते माकडं नव्हती तर, माणसांना तिने माकड केलं होतं… जेव्हा मी ते सर्व पाहिलं तेव्हा मला कळलं मी योग्य ठिकाणी आलो आहे. मला जे हवं आहे ते मी त्या महिलेला सांगितलं. ती मला म्हणाली, त्यासाठी काही बकऱ्यांचा बळी द्यावा लागेल”.
आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकरांचा पत्नीसह भन्नाट डान्स, लेक श्रियाने शेअर केला खास व्हिडीओ
यापुढे तो म्हणाला, “काळ्या रंगाचा जो पुतळा असतो, त्याचा वापर होताना मी पाहिलं आहे. माझं ध्येय मोठं होतं त्यामुळे मी केलं. त्यानंतर ‘बिग बॉस’मधून मला फोन आला. मी मुंबईत आल्यानंतर 4 दिवसांत मला फोन आला. कलर्सकडून मला फोन आला आणि हे खरं झालेलं आहे”. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची बरीच चर्चा रंगली होती. जानच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.