शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२०२४मध्ये छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, कोणी सेटवरच रडलं तर काही एकमेकांपासून दुरावल्याने भावुक

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2024 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 9 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte, Satvya Mulichi Satavi Mulgi, Bhagya Dile Tu Mala, Man Dhaaga Dhaaga Jodte Nava, Durga, Abeer Gulal serials off aired in the year 2024.

‘आई कुठे काय करते’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’... ते ‘दुर्गा’, ‘अबीर गुलाल’... या वर्षात लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांना केलं गुडबाय.

टीआरपीच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक चॅनल कसून प्रयत्न करत असतं. प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहता यावं, यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आणले जातात.  मात्र अनेकदा काही मालिकांना टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळत नाही. त्यामुळे या मालिका ऑफ एअर जातात. याउलट काही मालिका या चार-पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. या वर्षातही काही मालिकांनी टीआरपीच्या कारणामुळे बंद झाल्या. तर काही मालिकांचे कथानक पूर्ण झाल्यामुळे या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कोणत्या आहेत या मालिका? चला जाणून घेऊया… (Marathi Serials off aired in the year 2024)

आई कुठे काय करते : ‘आई कुठे काय करते’ मालिकेने तब्बल ५ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. अरुंधती, यश, आप्पा, अनघा, इतकंच नव्हे तर अनिरुद्ध व रुपाली या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. पण पाच वर्षांच्या निखळ मनोरंजनानंतर काही दिवसांपूर्वी निरोप घेतला. गेली अनेक वर्षे ही मालिका सुरू असल्याने कलाकारांनासुद्धा शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अश्रू अनावर झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सातव्या मुलीची सातवी मुलगी : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका मागील दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये आहेत. झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही होते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

भाग्य दिले तू मला : ‘भाग्य दिले तु मला’ ही मालिका कन्नड मालिका ‘कन्नदती’चा रिमेक होती. अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने अल्पवधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं. साधारणतः २०२२ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर यंदाच्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मन धागा धागा जोडते नवा : सार्थक आणि आनंदी यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी असणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. काही महिन्यांपूर्वी या मालिकेत ६ वर्षांचा लीप दाखववण्यात आलेला. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सारं काही तिच्यासाठी : झी मराठीवर ‘उदे ग अंबे उदे’ ही मालिका, याशिवाय ‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सारं काही तिच्यासाठी मालिकेने या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे व अभिनेते अशोक शिंदे मुख्य भूमिकेत होते.

अबीर गुलाल : २७ मे ला सुरू झालेली मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात भरली. अवघ्या सहा महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कमी टीआरपीमुळे या मालिकेने अवघ्या सहा महिन्यांत प्रेक्षकांना गुडबाय केलं. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दुर्गा : कलर्स मराठी वाहिनीवर ‘दुर्गा’ ही मालिका २६  ऑगस्टला सुरु झाली होती. पण नोव्हेंबर महिन्यातच ही मालिका संपली. अवघ्या तीन महिन्यांमध्ये मालिका संपत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच अवघ्या तीन महिन्यांत मालिका बंद झाल्याने याबद्दल अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं होतं. मालिकेत रुमानी खरे व अंबर गणपुळे यांनी मुख्य भूमिका सकारल्या होत्या.

Tags: aai kuthe kay kartebhagya dile tu malaMarathi Serials off aired in the year 2024Satvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
yo yo honey singh on diljit dosanjh

यो यो हनी सिंहचा दिलजीत दोसांझला पाठिंबा, कॉन्सर्टवरील अटी-नियमांवरुन म्हणाला, “आता आम्ही लस्सी, ताक, जलजीरावर गाणी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.