‘आई कुठे काय करते’ मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अरुंधती आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर देशमुखांच्या घरी राहत असते. कांचन व आप्पांनी अरुंधतीची जबाबदारी घेतलेली असते. मात्र अरुंधतीला देशमुखांच्या घरी राहायचं नसतं. तेव्हा यश सांगतो की त्याचं व आरोहीचं लग्न होईपर्यंत तू इथे राहावं. यावर अरुंधती तयार होते आणि म्हणते की, मी लग्न होईपर्यंत इथे राहील. मात्र अरुंधती इथे राहिलेली संजनाला काही आवडत नाही. (Aai Kuthe Kay Karte Promo)
अरुंधती देशमुखांच्या घरी आल्यापासून काही ना काही कारण देत ती तिला त्रास देताना दिसते. दरम्यान, संजनाने तिच्या घरी एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते. तर इकडे पार्टी सुरु असते, तेव्हा पार्टीत अप्पा काहीतरी खातात आणि जोरात ढेकर देतात. त्यावर संजनाची एक मैत्रीण अप्पांचा अपमान करते. ती अप्पांना म्हणते की, “काय फालतुगिरी आहे. आधी हावरटासारखं खायचं आणि मग सगळ्यांसमोर ढेकर द्यायचा”, असं भर पार्टीत म्हणते. यावर अरुंधती संजनाला सुनावते. अरुंधती संजनाला म्हणते, “हे आई आप्पांचं घर आहे संजना. आणि त्यांच्या घरी येऊन त्यांचा जर कोणी अपमान करत असेल तर ते मी सहन करणार नाही.
मृणाल ताईंनी आता आपल्या आप्पांची माफी मागावी”, असं म्हणत तिला सुनावते. हे ऐकून अरुंधतीचा पारा चढलेला असतो आणि ती संजनाच्या मैत्रिणीला चांगलेच सुनावते. आणि आप्पांची माफी मागायला सांगते. आता संजना तिच्या मैत्रिणीला माफी मागायला सांगणार का?, अरुंधतीच तिच्या मैत्रिणींसमोरचं हे वागणं पाहून संजनाचा राग अनावर होतो. संजना अरुंधतीने केलेला अपमान पाहून खूप चिडते.
अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, संजना तावातावात रूममध्ये येते. आणि अनिरुद्धला म्हणते की, “मी आता गप्प बसणार नाही. आणि तिला आता या घरातून बाहेर जावंच लागेल आणि मी तिला घराबाहेर काढणार”. आता संजना खरंच अरुंधतीला घराबाहेर काढणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.