‘आई कुठे काय करते’ मालिकेत रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत असतानाच मालिकेत आलेल्या एका धक्कादायक ट्विस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेत कांचन आजींची तब्येत खालावलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान कांचन आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केलं आहे. त्यामुळे कांचनवर खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळत आहे. घरातील गढूळ झालेल्या वातावरणाचा कांचन आजीला त्रास झाला असून त्यांनी या सगळ्याचा धसका घेतलेला पाहायला मिळत आहे. (Aai Kuthe kay karte Promo)
अरुंधती घरी येते आणि अप्पांना सांगते की, आईंना आयसीयूमध्ये ठेवलं आहे. पुढचे ४८ तास क्रिटिकल आहेत असं सांगितलं आहे. यावर आप्पा खूप खचतात. आणि बोलतात, ती मला अशी एकट्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. यावर अरुंधती, आरोही आप्पांना सांभाळतात. आणि खंबीर राहायला सांगतात. त्यानंतर अरुंधती हॉस्पिटलमध्ये येते, तेव्हा डॉक्टर येऊन सांगतात की, “कांचन ताईंची प्रकृती थोडी गंभीर आहे. त्या प्रतिसाद देत नाही आहेत”, हे ऐकून अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसतो.
मालिकेत सध्या अनिरुद्ध घराच्या वाटणीसाठी लढाई करताना दिसत आहे. संजनाचं अविचारी बोलणं अनिरुद्धला पटतं आणि तो संजनाचं ऐकून घरासाठी भांडण करतो. तर संजना घरातील इतरांना अनिरुद्धच्या जीवावर जगतो म्हणून खूप ऐकवते. संजना आप्पा आणि कांचनला त्यांच्या खाण्यापिण्यावरुन सतत बोलत असते. सततच बोलणं ऐकून कांचन आईला खूप त्रास होतो. आणि संजना त्यांना सुनावत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागतं आणि त्या खाली पडतात.
संजना आप्पा आणि कांचनला त्यांच्या जेवणावरुन बोलून दाखवते. हे काही अरुंधतीला पटत नाही. अरुंधती देशमुखांच्या घरी येत अनिरुद्ध व संजनाला सक्त ताकीद देत सुनावते. ज्येष्ठ नागरिकांवर घरगुती हिंसाचार होत आहे, अशी तक्रार पोलिसांत देईन असं अरुंधती संजना व अनिरुद्धला बजावते. आता अनिरुद्ध व संजनाचं बोलणं कांचनच्या जीवावर बेतणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.