सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सदैव हसत राहा आणि…”, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “माझ्याकडून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2024 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali On Raj Thackeray

"सदैव हसत राहा आणि…", राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, "माझ्याकडून…"

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते दिवाने आहेत. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. मराठी चित्रपट, मालिका व वेबसीरिज यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्राजक्ता अभिनयाशिवाय राजकारणातही दिसणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. (Prajakta Mali On Raj Thackeray)

प्राजक्ता माळी नेहमीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते. इतकंच नव्हेतर प्राजक्ताच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडच्या उदघाटन सोहळ्यालाही राज ठाकरे यांनी पत्नीसह हजेरी लावलेली पाहायला मिळाली. ‘प्राजक्तराज’ असं या प्राजक्ताच्या ब्रॅंडचं नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅंडचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

आणखी वाचा – कांचन आजींची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल, संजना-अनिरुद्धमुळेच जीवाला धोका

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

राज ठाकरे यांच्या वाढीदिवसानिमित्त प्राजक्ताने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केला असून खास कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता राज ठाकरे यांच्याबरोबर पाहायला मिळत आहे. राज साहेबांबरोबरचे फोटो शेअर करत तिने, “आदरणीय आपणांस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. राज ठाकरेजी. जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं, याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व प्राजक्तराज परिवाराकडून शुभकामना. #शुभेच्छा #अविरत #श्रीमंत. फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा”, असं कॅप्शन देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – अहिल्यादेवी घरात नसताना दामिनीने घेतली त्यांची जागा, पारू आदित्यला फिरायला घेऊन गेल्यानंतर गनीलाही बेदम मारलं अन्…

अभिनेत्रीची राज साहेबांसाठीची ही पोस्ट पाहून राजकारणात तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. तसेच तिचा ‘लकडाऊन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘जुळून येती रेशिमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.

Tags: marathi actorprajakta maliPrajakta Mali On Raj Thackerayraj thackeray birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Mitali Mayekar specially wished to husband Siddharth Chandekar on his birthday.

"जेमिनी असेल घरी तर…", बायकोने वाढदिवसादिवशी प्रेम व्यक्त करताच सिद्धार्थ चांदेकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, "आनंदाची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.