छोट्या पडद्यावरील मालिका हे अनेकांच्या घरी नेहमी पाहिल्या जातात. एकीकडे विविध विषयांवर आधारित अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना काही लोकप्रिय मालिका आहेत, जे अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशातच एखादी मालिका जेव्हा रंजक वळणावर येते, तेव्हा ती कधी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर कधी ती प्रेक्षकांना खटकते. अश्याच एका लोकप्रिय मालिकेचा एक प्रोमो समोर आला, जो सध्या चर्चेत आला आहे. (Aai Kuthe Kay Karte new Promo)
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मालिकेच्या कथानकात येणारे अनेक रंजक वळण यांमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत येते. अरुंधती या पात्राभोवती फिरणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असले. तरी, दरवेळेस होणाऱ्या बदलामुळे या मालिकेला जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. असाच एक प्रोमो नुकताच समोर आला, ज्यावर नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत.
नुकतंच ‘आई कुठे काय करते’चा नवा प्रोमो समोर आला. ज्यामध्ये असं दाखवण्यात येतं की, आशुतोष अरुंधतीचे जुन्या काळातील फोटो पाहतो. त्यानंतर आशुतोष “मला बाबा व्हायचंय अरुंधती, आपण मूल दत्तक घेतलं तर…”, असं म्हणत तो अरुंधतीकडे बाबा होण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यावर अरुंधती त्याला नकार देताना म्हणते, “तसं शक्य नाही.” पुढे ती म्हणते, “पुन्हा एक नवीन जीव आपल्या आयुष्यात येणार, त्याला मोठं करायचं. या सगळ्याला खूप बळ लागतं. आणि हे सगळं आता शक्य होणार नाही.” त्यामुळे अरुंधती पुन्हा एकदा आई होणार का? अशी चर्चा सध्या होत आहे.
हे देखील वाचा – “या प्रसंगी असायला हवी होती”, सई लोकुरच्या डोहाळ जेवणाला बेस्टफ्रेंडची गैरहजेरी, नेटकरी प्रश्न विचारत म्हणाले, “ती कुठे आहे?”
दरम्यान, मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर आपला संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी यावर कमेंट करत म्हणाला, “हेच जर अनिरुद्ध संजनाला म्हणाला असता तर चुकीचं. पण आता आशुतोष म्हणतोय तर काही तथ्य असेलच.”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली की, “आशुतोष तर आधीच ३ मुलांचा बाबा, सासरा आणि एका नातीचा आजोबा पण आहे. अजून इच्छा पूर्ण झाली नाही का? मला आशा आहे की, हे लेखकांना समजलं असेल.”.
हे देखील वाचा – मुलींचे चेहरे न दाखवण्यावरून नेटकऱ्यांनी केला क्रांती रेडकरला सवाल, उत्तर देत म्हणाली, माझ्या मुलींना सांभाळायची जबाबदारी…”

आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, “अरेरे, कोणीतरी त्या आशुतोषची बाजू समजून घ्या रे, त्यालाही बाबा बनायची इच्छा असेलच ना. दत्तक घेणार का मग आता बाळ? बाकी या मालिकेच्या कथानकाबद्दल तर बोलायलाच नको.” तर, अनेक नेटकरी आता हेच पाहायचं राहिलं असल्याचं यावर म्हणत आहे. आता मालिकेत प्रेक्षकांना पुढे काय पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल. मात्र, हा प्रोमो सध्या बराच चर्चेत आला आहे.