बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुंदर सजावट, समुद्र किनारा अन्…; ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ समोर, पत्नी कोण आहे?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 2, 2025 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niranjan Kulkarni Wedding

सुंदर सजावट, समुद्र किनारा अन्…; 'आई कुठे…' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ समोर, पत्नी कोण आहे?

Niranjan Kulkarni Wedding : मराठी मनोरंजन सृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी गपचूप लग्नगाठ बांधली आहे आणि त्यानंतर ते चर्चेत आले आहेत. या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. हा अभिनेता मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. हे नाव म्हणजे निरंजन कुलकर्णी. आई कुठे काय करते या मालिकेतून निरंजनने अरुंधतीच्या मोठ्या मुलाची म्हणेजच अभिषेक देशमुख ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे निरंजनला विशेष लोकप्रियता मिळाली. आता निरंजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने गुपचूप लग्न केले असून त्याच्या शाही लग्नाचे फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी दिली आहे.

सोशल मीडियावर निरंजन बऱ्यापैकी सक्रिय असतो. बरेचदा तो फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच निरंजनने आता थेट सोशल मीडियावर लग्नसोहळ्याची गुडन्यूज देणारा एक व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी देत सुखद धक्का दिला आहे. निरंजनचे हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असल्याचं व्हिडीओमधून समोर येत आहे. अगदी राजेशाही थाटामाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

View this post on Instagram

A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)

सुंदर अशी सजावट, समुद्र किनारा अशा रम्य ठिकाणी निरंजनचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. निरंजन व त्याची पत्नी या व्हिडीओमध्ये एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. तर उपस्थित पाहुणे, कुटुंबीय, जवळचे नातेवाईक या जोडप्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत. निरंजनने हा व्हिडीओ शेअर करत, “आमच्या प्रेमाची नवी सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनच्या खाली अभिनेत्याने “लग्न, रिसेप्शन, डेस्टिनेशन वेडिंग, वेडिंग सेलिब्रेशन”, असे हॅशटॅग त्याने वापरले आहेत.

आणखी वाचा – पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

निरंजनच्या पत्नीचं नाव मनीषा गुरम असे आहे. मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाइल एक्स्पर्ट म्हणून काम पाहते असं तिच्या बायोमध्ये मेन्शन करण्यात आले आहे. निरंजनने शेअर केलेल्या रिसेप्शनच्या व्हिडीओमध्ये दोघांनी लग्नासाठी इंडोवेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. निरंजन यावेळी काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूप खास दिसत होता. तर त्याची पत्नी मनीषा ही वेस्टर्न गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. त्यांच्या रिसेप्शनचा सिनेमॅटिक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेक कलाकार मंडळींनीही निरंजनच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: marathi actormarathi serialNiranjan Kulkarni Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Next Post
mamta kulkarni statement

“मी कल्की अवतार पाहिलाय आणि...”, ममता कुलकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझं गोत्रही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.