Madhurani Prabhulkar Trolling : सध्या सर्वत्र उष्णेतचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, गरमीमुळे सगळेच त्रासले आहेत. पण या गरमीचा एका अभिनेत्रीने उचललेला एक वेगळाच फायदा अनेकांच्या डोळ्यादेखत आला आणि चर्चेचा विषय ठरला. हो. गरमी स्पेशल या मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेले फोटोशूट अनेकांच्या डोळ्यांत खुपलं असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही. आणि ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर ‘आई कुठे काय करते’ फेम आई म्हणजेच मधुराणी प्रभुलकर. आईने केलेल्या हॉट फोटोशूटने साऱ्यांना घाम आला आणि सुरु झाला तो ट्रोलिंगचा भडीमार. का?, मालिकेत साकारलेल्या आईच्या भूमिकेने चौकट मोडून काही वेगळं केलं तर यांत तिचं काय चुकलं?.
आपण मराठी माणसांनी मराठी माणसांचे पाय खेचायचंच ठरवलं आहे का?. चौकटी बाहेर जाऊन काय करायचं एखाद्याने ठरवलं की, त्याकडे अशा नजरेने पाहायलाच हवं की समोरचा ओशाळेल. पण का?, आज जग पृथ्वीपर्यंतच मर्यादित राहील नाही आहे. ते भरधाव वेगाने मार्ग निवडत आहे. अशात एखाद्या व्यक्तीने चौकट मोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यात काय चुकीचं केलं?. एखादी भूमिका एका कलाकाराने साकारल्यानंतर कायम त्याने त्याच भूमिकेत दिसावं हा अट्टाहास मुळात का करावा?. आपण व्यक्तीस्वातंत्र्य देशात राहतो हे विसरला आहात का?, याची सतत का आठवण करुन द्यावी लागते.
आणखी वाचा – सोनू कक्करने भावंडांशी कायमचं तोडलं नातं, असं नक्की काय बिनसलं?, एकत्र राहिले पण…
कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ज्या व्यक्तिरेखेने एक आदर्श कलाकार म्हणून आपली ओळख दिली. ती एकदम ३६० डिग्रीमध्ये बदलली तर मूळ व्यक्तीरेखेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचंही मत बदलतं?. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसणारी सोज्वळ आई मालिका संपल्यानंतर, तिच्या भूमिकेतून बाहेर आल्यानंतर तशीच का राहील?, इतकंही न समजावं इतके भोंदू आहात का?. मधुराणीने शेअर केलेलं पांढरं शर्ट आणि मोकळे केस या हॉट लूकमधील फोटो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट वाचून तर मी थक्क झाले. एखादा बदल न स्वीकारण्याचा मानवी स्वभाव आणि बदल स्वीकारुन त्याला प्रोत्साहन देण्याचा स्वभाव अशी दोन भिन्न माणसांचे स्वभाव या पोस्टच्या कमेंट सेशनमध्ये दिसले आणि कोणाचं कौतुक करायचं हा मोठा प्रश्न पडला. हो. “आई कुठे काय करते?”, “आई अशी काय करते?”, “तुमच्या व्यक्तिरेखेला शोभत नाही”, “याची काही गरज नव्हती” अशा अनेक कमेंट वाचल्या आणि पायाखालची जमीन घसरली. ट्रोलिंगची सीमाच सोडली तुम्ही.
यांत कौतुकाची बाब म्हणजे अभिनेत्रीच्या या फोटोशूटला काही चाहत्यांनी दिलेला पाठिंबा. “आई नावाच्या रोलमध्ये खूप चांगलं काम केल्याने कदाचित असं पहायची सवय नाहीये पण यालाच यश म्हणायचं”, “सुंदर अभिनेत्रीला एका इमेजमध्ये अडकवणं चूक आहे, कमी वयातही इतकी छान आईची भूमिका साकारली याचं कौतुक करा”, अशा काही कमेंट करत चाहत्यांनी तिला इमेज ब्रेक करत नवीन काही साध्य करण्यास प्रोत्साहन दिलं आहे अर्थात त्याचं करावं तितकं कौतुक कमीच. इमेज ब्रेक करत काही वेगळं करण्याची धडपड तुम्हाला नसेल जमत तर दुसऱ्याआणखी वाचा – सोनू कक्करने भावंडांशी कायमचं तोडलं नातं, असं नक्की काय बिनसलं?, एकत्र राहिले पण…ला टोकू नका. आधी आपण काय करतोय, आपण कुठे आहोत, आपण काय साध्य केलं आहे हे पहा आणि दुसऱ्याला ट्रोल करताना शंभरदा विचार करा.