प्रत्येक कलाकाराला कोणत्या ना कोणत्या खडतर प्रवासातून जावंच लागतं. सुरुवातीला सिनेसृष्टीत काम करताना अनेकांची कामं मिळवण्यासाठी धडपड सुरु असते. त्यांनतर शुटिंगनिमित्त या कलाकारांची धावपळ नेहमीच पाहायला मिळते. ही कलाकार मंडळी शूटिंगसाठी अनेकदा प्रवास करत असतात. एका श्येड्युलनंतर दुसऱ्या श्येड्युलला जाताना कित्येकदा त्यांना स्वतःसाठी वेळही मिळत नाही. पडद्यावर काम करताना त्यांच्या कडून काही चुका झाल्या तर प्रेक्षक लगेचच त्यांना ट्रोल करायला मागे पुढेही पाहत नाहीत. मात्र यामागे त्यांच्या अपार मेहनतीचा तसा कुणी विचार करताना दिसत नाही. (Ashvini Mahangade Struggle Post)
अशीच एक मेहनती, कष्टाळू, स्वाभिमान अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. आजवर अश्विनीने तिच्या अभिनय सहलीच्या जोरावर तिचा असा स्वतःचा चाहतावर्ग तयार केला आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला आज संपूर्ण महाराष्ट्रभरात ओळखली जाते. मालिकेतील तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. शिवाय, ती अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे. याव्यतिरिक्त ती एका संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करताना नेहमीच दिसत असते.
सोशल मीडियावरही अश्विनी बऱ्यापैकी सक्रिय असते. विशेषतः अश्विनीचे हटके फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. शिवाय ती गड किल्ल्यांची भेट घेतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. शिवाय ती गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी धडेही देत असते. चित्रीकरणातून वेळात वेळ काढून ती या आवडी जोपासताना दिसते. अश्विनी कलाप्रेमी आहे, हे साऱ्यांनाच माहित आहे. अत्यंत मेहनती अभिनेत्रींच्या यादीत अश्विनीच नाव आवर्जून घेणं चुकीचं ठरणार नाही.
नुकताच अश्विनीच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अश्विनी मेकअप करताना दिसतेय, दरम्यान अश्विनीचा मेकअप करणाऱ्या दादांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत त्यांनी म्हटलं आहे की, “सकाळी ११ ते पहाटे ३ पर्यंत न थकता काम करणे सोपे नसते, त्यातून पुन्हा ५ ते ६ तासाचा प्रवास करून, पुन्हा दुसऱ्या सिरीयलचे शूट करणे, कुठून मिळते तुला ही ऊर्जा. आदिशक्ती म्हणतात ती हीच का, आमच्यासाठी तू दुर्गेचा अवतार आहेस, तुझी कृपा कायम अखंड अशीच राहू दे.” असं म्हटलं आहे. यावरून अश्विनीच कलेवरील प्रेम पाहायला मिळतंय.