मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रचंड हाल सोसले पण…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेच्या आजीचं निधन, भावुक होत म्हणाली, “तिने घेतलेली पप्पी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 7, 2023 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashvini Mahangade Emotional

"प्रचंड हाल सोसले पण…", 'आई कुठे…' फेम अश्विनी महांगडेच्या आजीचं निधन, भावुक होत म्हणाली, "तिने घेतलेली पप्पी…"

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अश्विनी व तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत तिच्या आजीच्या निधनाची बातमी दिली. अश्विनीच्या जवळच्या व्यक्तीचं म्हणजेच तिचं भरभरून लाड करणाऱ्या आजीचं निधन झाल्याने अभिनेत्री भावुक झाली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून आजीबरोबरचा फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. (Ashvini Mahangade Emotional)

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा या भूमिकेमुळे अश्विनी महांगडेला लोकप्रियता मिळाली. अश्विनीने तिच्या आजीच्या निधनाची बातमी पोस्ट शेअर करत दिली आहे. अश्विनी म्हणाली, “आजी, फक्त प्रेमाचा साठा पण भारी शिस्तीची. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. एक काळ असा होता जेव्हा प्रचंड हाल सोसले पण कल्पतरू सारखी खंबीर उभी राहिली. माझे आणि बाबांचे (पाहुणे म्हणायची ती बाबांना कारण जावयाचे नाव घ्यायचे नसते) किती कौतुक. आम्हा सगळ्यांची चिंता तिला नेहमी असायची. मशाल दौडला आला तर १० वेळा मला फोन केला आणि त्याची काळजी घ्यायला सांगितली.”

आणखी वाचा – फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन प्रेक्षकांनी केली आर्थिक मदत, ‘त्या’ व्हिडीओनंतर जुई गडकरीचं होतंय कौतुक, आश्रमात गेली अन्…

यापुढे अश्विनीने लिहिलंय, “‘रयतेच्या स्वराज्य प्रतिष्ठान’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांसाठी जेवणाची सोय नानांनी केली ती आजीच्या घरी. आजी, मामा, मामी, विजय, अक्षय सगळेच कामाला लागले. एखादी जबाबदारी पार पाडताना सगळ्यांना अगदी प्रेम द्यायची. तिचं प्रेम, तिची माया, घरात शिरल्या शिरल्या तिने घेतलेली पप्पी सगळंच आता परत अनुभवता येणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

आणखी वाचा – “दुसऱ्या देशात जा”, दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचा सल्ला दिल्यानंतर वैभव मांगले ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कलाकार आहात म्हणून…”

अश्विनीने आजीबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या गोड आठवणी ही शेअर केल्या आहेत. अश्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अश्विनीचा होणार नवरा नीलेश जगदाळे याने ही तिच्या पोस्टवर कमेंट करत ‘भावपूर्ण श्रद्धांजली’असं म्हटलं आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटल्याप्रमाणे तिच्या आजीला जावयाचंही विशेष कौतुक होतं.

Tags: ashvini mahangadeAshvini Mahangade Emotionalentertainmentmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Namrata Sambherao share a funny video of her son Rudraaj

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावच्या लेकाची स्वयंपाकघरात भलतीच करामत, आजीपासून लपवून चिमुकल्याने काय केलं पाहा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.