‘आई कुठे काय करते’ ही मालिका बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.मालिकेने सातत्याने टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या पाच मालिकांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मालिकेमध्ये सतत येणारी रंजक वळण यामुळे मालिकेने अनेक प्रेक्षक जोडून ठेवले आहेत. (AKKK episode update)
सध्या मालिकेत ईशा व अनिशच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. विनासोबत असणारी पार्टनरशिप संपल्यामुळे अनिरुद्धने ईशा व अनिशच्या लग्नाला विरोध केला आहे.अनिरुध्दचा हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न संपूर्ण कुटुंब करत आहे. परंतु अनिरुद्ध त्याच्या निर्णयावर अगदी ठाम आहे.त्यामुळेचं अरुंधती ईशाला केळकरांकडे घेऊन जाते.
पाहा काय घडणार आजच्या भागात? (AKKK episode update)
ईशा व अनिश भेटतात तेव्हा ईशा अनीशला म्हणते, की आईला आपलं लग्न पुढे ढकलायचं आहे, ती बाबांसारखं बोलून दाखवत नाही पण तिला देखील आपलं लग्न व्हायला नको आहे, अनिश तिला म्हणतो कि मला माहिती आहे तुला पळून जाऊन लग्न करायचं आहे या मुद्यावरून अनिश तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो.परंतु ईशा त्याच ऐकत नाही.यश ईशाला भेटण्यासाठी केळकरांकडे आलेला असतो.तेव्हा ईशाच्या वागणुकीबद्दल अरुंधती यश सोबत बोलत असते.

तितक्यात आशुतोष तिकडे येतो, आणि आणि त्याला आलेल्या अनीशच्या मेसेज बदल सांगतो,तो मेसेज असा असतो की, ‘चाचू तुम्हला कोणाला ही न विचारता मी एक निर्णय घेतला आहे, तो निर्णय तुम्हाला कोणलाही आवडणार नाही’. या मेसेज मुळे सगळे काळजीत पडतात, अरुंधती लगेच देशमुखांकडे फोन करून या मेसेज बदल सांगते. हे ऐकून अनिरुद्ध खूप चिडलेला असतो, तितक्यातच अनिश आणि ईशा लग्न करून देशमुखांकडे येतात. अनिश आणि इशाचं लग्न झालेलं पाहून अनिरुद्धचा संताप होतो. ईशा व अनिशच्या या लग्नाचे आता काय परिणाम होणार हे बघणं रंजक ठरणार आहे.(AKKK episode update)
हे देखील वाचा : पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले अभिनेते सागर तळाशीकर, फेसबुक लाईव्हद्वारे मांडली प्रशासनाकडे व्यथा