अनेक नाटक, सिनेमा व मालिकांमध्ये दिसणारे व छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत तन्वीच्या बाबांची भूमिका करणारे अभिनेते सागर तळाशीकर सध्या एका कारणाने चर्चेत आलेले आहे. सागर तळाशीकर त्यांच्या आईसोबत काल कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करत असताना तब्बल ६ तास ते पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते. पण सुखरूप घरी पोहोचल्यानंतर सागर यांनी सर्वांचे आभार मानले, शिवाय पुण्यातील ट्रॅफिकसंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. (sagar talashikar facebook live)
अभिनेते सागर तळाशीकर हे त्यांच्या आईबरोबर काल कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. पण पुण्याजवळ ते पोहोचले असता वारजेच्या पुलाआधीच्या एका पुलावर तब्बल ५ ते ६ तास अडकले होते. मात्र रात्री ८ वाजेच्या दरम्यान ते पुण्यात त्यांच्या बहिणीच्या घरी सुखरूपपणे पोहोचले. विशेष म्हणजे, अभिनेत्याच्या आईचे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते आणि याकाळात त्यांनी जेवण व गोळ्या न घेता अगदी व्यवस्थित होत्या.
पुण्यातील ट्रॅफिकबद्दल अभिनेत्याने फेसबुक लाईव्ह केला, ज्यात त्यांना याकाळात आलेला अनुभव सांगताना ट्रॅफिक काळात आपली चौकशी करणाऱ्या चाहते व नेटकऱ्यांचे आभार मानले. शिवाय पुण्यातील ट्रॅफिकमुळे होणारी गैरसोय टाळावी व यावर योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली.
पहा काय म्हणाले सागर तळाशीकर (sagar talashikar facebook live)
पोस्ट केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये सागर तळाशीकर म्हणतात, “मित्रहो, मी काल कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करतात असताना दुपारी १.३० ते ७.३० वाजेपर्यंत ट्रॅफिकमध्ये अडकलो व रात्री ८.३० ला पुण्यात घरी पोचलो. आम्ही एकाच पुलावर ५ ते ६ तास होतो व सतत ७०० ते ८०० मीटर मागे पुढे झालो. पण तिथले ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी कोणीच नव्हते. नेमकं माझ्या ८५ वर्षांच्या आईचं नुकतंच मोतीबिंदू ऑपरेशन झालं आहे, ती पण न खाता बरोबर होती. तिला शुगर व अन्य गोळ्या घ्यायच्या होत्या, मात्र ट्रॅफिकमुळे ते घेता आले नाही. असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यानी करायचं काय ? मात्र रात्री ७.३० ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तिथं कुणीही तिथली वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही पोलीस किंवा कार्यकर्ता नव्हता. पण आम्ही घरी पोहोचलो आणि आई उत्तम आहे.” (sagar talashikar facebook live)
हे देखील वाचा : “स्त्री घर चालवते तर…”, ‘बाईपण भारी देवा’च्या कोट्यवधी रुपयांच्या कमाईनंतर केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “स्वामींची…”