सध्या मालिकांमध्ये लग्न सराईची धामधूम पाहायला मिळतेय. यातच भर घालत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष हे ही लग्नबंधनात अडकणार आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत काही दिवसांपासून रंजक वळणे येतच आहेत. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या आणि अरुंधतीला या सगळ्यातून जावं लागलं. अखेर नाराजी व्यक्त केलेल्या सदस्यांपैकी कांचन आईचं राग दूर झाला आणि त्याणी पुढाकार घेत अरुंधतीच कानयदान करून अरुंधतीच्या या निर्णयात सहभाग दाखवला आणि सर्वानी मिळून अरुंधतीच्या पाठवणींची तयारी देखील सुरु केली. (Arundhati Anirudh’s fight)

अनिरुद्धचा राग काही शांत होताना दिसत नाही आता पुन्हा अनिरुद्ध अरुंधतीशी वाद घालणार आहे तर यावेळी मात्र षंढपणे ऐकून न घेता अनिरुद्धच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत अरुंदहीतने तिचा आतापर्यंतचा राग व्यक्त केला. तुम्हाला लवकरत बरं होण्याची गरज आहे. डोक्यावर मुकुट नसलेला आणि ज्यांचे गुलाम ज्यांच्या आज्ञेत नाहीत असे राजा तुम्ही आहात, अशा शब्दात अरुंधतीने राग व्यक्त केला आहे.
=====
हे देखील वाचा – ‘हृदयी वसंत फुलतानाचं’ शूटिंग करताना झालेली फजिती
निवेदिता सराफ यांनी सांगितला अशी ही बनवा बनवीचा धमाल किस्सा
======
घरातील सगळे अंगात येऊन नाचत आपला आनंद व्यक्त करताना दिसतायत तर घरातील नसविन प्रेम युगल एकमेकांना कॉम्प्लिमेंट देताना दिसत आहे. तर दुसरीकडे घरच्यांच्या आग्रहास्तव आशुतोष ने अरुंधती साठी सुंदर उखाणा घेतला तर अरुंधती माझ्यासाठी गा म्हणून आशुतोष ने अरुंधतीला गाण्यातून उखाणा घेण्याचा आग्रह केला आणि अरुंधतीने तो आग्रह पूर्ण केला. तर आता अरुंधती देशमुखांचं हे घर सोडून जातंच जुन्या आठवणीत रमताना दिसत आहे. (Arundhati Anirudh’s fight)
अरुंधतीचा आशुतोष सोबतचा संसार कसा होणार? अनिरुद्ध काही नवीन अडचणी निर्माण करणार का? अरुंधती या संकटाना कशी सामोरंइ जाणार हे पाहून रंजक ठरणार आहे. त्याच बरोबर मालिकेत पुढे गौरी आणि अभिच पुढे काय होणार अरुंधतीशिवाय देशमुख कुटुंबाबा कस घर चालवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक देखील दिसत आहेत.