यश-गौरीचं नातं तुटणार?,अरुंधती देणार मुलाला धीर

Gauri Yash
Gauri Yash

आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतंय.या मालिकेत सध्या सुरु असलेलं कथानक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतंय.मालिकेत नुकतंच अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न पार पडलं असून अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील हळूहळू फुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. हे पाहून सध्या प्रेक्षक देखील आनंदी झालेत.मात्र अरुंधती ही सध्या तिच्या संसारात देखील रमत असली तरीही ती तिच्या मुलांकडे दुर्लक्ष करत नाही. हे नुकतंच तिच्या समोर आलेल्या प्रोमोमधून समजतंय.(Gauri Yash)

image credit instagram

अरुंधती ही तिच्या जबाबदारीकडे कधीही दुर्लक्ष करताना दिसत नाही. आता मालिकेत सध्या एक रंजक वळण पाहायला मिळतंय. एकीकडे अभिला त्याच्या चुकीची जाणीव झाली असून, तो केळकरांच्या घेरी जाऊन अरुंधती आणि आशुतोषची माफी मागतोय. यावरून अनिरुद्ध त्याच्यावर चिडतो पण दुसरीकडे यश हा पुन्हा एकदा खचला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये गौरी आणि यश यांचं नातं तुटणार आहे.यश आणि गौरी हे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र आई वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी ती अमेरिकेला पुन्हा जाणार आहे.जाताना ती यशला त्यांच्या साखरपुड्याची अंगठी परत करणार आहे. त्यामुळे यशला पुढे काय करायचं असा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे तो अरुंधतीकडे येणार आहे. त्यावेळी अरुंधती यशला धीर देताना दिसते. तर आता अरुंधती ही यश गौरीचं नातं वाचवणार का? यश पुढे काय पाऊल उचलणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले.(Gauri Yash)

====

हे देखील वाचा – ‘प्रेमात मी स्वतःला हरवून बसले..’

====

गौरी याआधी ही यशला सोडून अमेरिकेला गेली होती. पण ती अरुंधतीच्या लग्नासाठी आणि इथे राहायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी देशमुखांच्या घरी आली होती पण येथील परिस्थिती पाहून ती अमेरिकेला जाणार आहे, यावेळी गौरी यशला साखरपुड्याची अंगठी देखील परत करणार तर आता यश तिला थांबवणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Bhagya Dile Tu Mala Today Episode
Read More

राज कावेरी आणि वैदेहीच Reunion!सानियाला होणार अटक?

पोलीस सानिया पर्यंत पोहचणार का? सानिया विरोधात विधीने साक्ष दिल्यावर माहेरचा चहा रत्नमाला मोहिते आणि राज कावेरीला त्यांची पूर्ण प्रॉपर्टी परत मिळणार का?
Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode
Read More

अरुंधती परतणार! आशुतोषला भावना अनावर अरुंधतीला मारली घट्ट मिठी

अरुंधतीच्या येण्यानं गोखले कुटुंब आनंदी तर देशमुख कुटुंब मध्ये संजना अनिरुद्धचा वाद सुरूच अरुंधती रागात म्हणाली मी कोणासाठी उपवास धरू या अनिरुद्ध साठी तर ते...... (Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)