संगीतकार ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रेहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ए. आर. रेहमान यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्याची बातमी समोर आल्यानंतर रहमान आणि मोहिनी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. मोहिनीमुळे एआर रेहमानने पत्नीला घटस्फोट दिल्याचे लोकांनी म्हटले. यावर आता एआर रहमान यांनी स्वत: भाष्य केलं आहे. त्यांच्या घटस्फोटाचा संबंध मोहिनी यांच्याशी जुळवून बदनामी करण्याऱ्यांविरुद्ध रहमान कायदेशीर कार्यवाही करणार आहे. (A. R. Rahman Legal Notice)
रहमान यांनी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये त्याच्या लग्न आणि घटस्फोटावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. एआर रहमान यांनी सर्व बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये सर्व यूट्यूब चॅनलना त्याच्या आणि त्याची बासिस्ट मोहिनी डे यांच्यातील कथित अफेअरचे व्हिडिओ काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. एआर रहमानने ही पोस्ट शेअर करताना पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्याबद्दल सांगितले होते. यानंतर मोहिनी डेसोबत त्याच्या लिंकअप आणि अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.
Notice to all slanderers from ARR's Legal Team. pic.twitter.com/Nq3Eq6Su2x
— A.R.Rahman (@arrahman) November 23, 2024
मोहिनी डे यांनी तिच्या आणि एआर रहमानच्या घटस्फोटाच्या संबंधावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि या सर्व पोस्टवर टीका केली होती. त्यानंतर आता रहमान यांनी सोशल मीडियावर यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. एआर रहमान यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये पुढील २४ तासांच्या कालावधीत आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यात यावा, असे म्हटले आहे. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला नाही तर, भारतीय न्यायिक संहिता २०२३ च्या कलम ३५६ अंतर्गत फौजदारी मानहानीचा गुन्हा नोंदवला जाईल. अशा परिस्थितीत, या कायद्याच्या कलम ३५६ (२) अंतर्गत, न्यायालयाने निर्धारित केलेल्या दंडासह दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
दरम्यान, एआर रहमान आणि त्यांच्या बँड सदस्य मोहिनी डे यांनी एकाच दिवशी त्यांच्या जोडीदारापासून विभक्त होण्याची घोषणा केल्याने त्यांच्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर होताना पाहायला मिळाल्या. १९ नोव्हेंबर रोजी रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी २९ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच मोहिनी डेनेही पतीपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा केली. या एकाच बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि मोहिनीमुळे रेहमान आणि बानोचे नाते तुटल्याच्या अफवा पसरू लागल्या.