मंगळवार, जुलै 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगा झाला हो! ‘साधी माणसं’ फेम अभिनेता झाला बाबा; चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 20, 2026 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akash Nalawade Becomes Father

'साधी माणसं' फेम अभिनेता झाला बाबा

Akash Nalawade Becomes Father : सध्या ‘साधी माणसं’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. कमी वेळेतच ही मालिका लोकप्रिय झाली, मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. विशेषत सत्या आणि मिराची जोडी प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. या जोडीतील सत्याचं पात्र साकारणारा अभिनेता आकाश नलावडे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. आकाश नलावडेच्या घरी आनंदाचं वातावरण असून, तो नुकताच बाबा झाला आहे.

अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे, त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशने बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती आणि आता लग्नानंतर दोन वर्षांनी त्याला पुत्र प्राप्ती झाली. ही आनंदाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. आकाशच्या मित्रमंडळींनी आणि सहकलाकारांनी त्याला टॅग करत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही कमेंट्स आणि स्टोरीजद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. (Akash Nalawade Becomes Father)

आणखी वाचा – दिव्या बनली नवी कॅप्टन?, ‘बिग बॉस’ने पूर्ण गेम पलटवला; घरातील सदस्य दिव्याच्या विरोधात, म्हणाले, “कॅप्टन्सी पदासाठी दिव्या अनुभवी नाही”

आकाश नलावडेची पत्नी रुचिका धुरी आहे, दोघांनी २०२३ साली विवाह केला होता. आता त्यांच्या संसारात एका नव्या सदस्याची भर पडली आहे. विशेष म्हणजे, आकाशला पुत्रप्राप्ती झाली असून, या गोड बातमीने त्याचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. आकाश नलावडे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत पश्या या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साधी माणसं’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता वैयक्तिक आयुष्यातही नवा अध्याय सुरू झाल्याने आकाश आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. (Akash Nalawade Becomes Father)

आणखी वाचा – बॉलीवूड अभिनेत्याच्या सुरक्षा वाहनाचा भीषण अपघात; अपघातादरम्यान २ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Tags: Akash Nalawade Becomes Fathermarathi actormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Prasad Oak Son's Engagement

प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा संपन्न; अमृता खानविलकरची खास उपस्थिती, शेअर केले खास फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.