शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडला कंटाळून दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबई सोडणार, स्वतः खुलासा करत म्हणाले, “खूप किळस…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anurag kashyap viral statement

अनुराग कश्यप मुंबई का सोडणार? कारण आलं समोर

बॉलिवूडमधील अनुराग कश्यप हे खूप प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अनेकदा ते त्यांच्या रोखठोक वकतव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले बघायला मिळतात. व्यावसायिक आयुष्यामुळे त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरु असते. त्याबरोबरच खासगी आयुष्यदेखील खूप प्रकाशझोतात आले आहे. अशातच आता एका नवीन कारणामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबई सोडणार असल्याचे भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वत्र आता याबद्दल चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र अनुराग असं का म्हणाले? याबद्दल सगळ्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर आता अनुराग असं का म्हणाले? त्यांच्या म्हणण्याचा नक्की अर्थ काय? याबद्दल आपण जाणून घेऊया. (Anurag kashyap viral statement)

एका माध्यमाशी बोलताना अनुराग यांनी चित्रपट तयार करण्यासाठी होणाऱ्या खर्चाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “माझ्यासाठी आता बाहेर जाऊन प्रयोग करणे कठीण आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यामुळे निर्माते फायदा व मार्जिनचा विचार करतात. चित्रपट तयार होण्याआधीच तो विकला कसा जाणार? याबद्दल चर्चा होते. त्यामुळे चित्रपट बनवण्याची ती मजा पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे आता मुंबई सोडून जाणार आहे. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जाणार. तिथे प्रेरणा मिळते”.

आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या सुखी संसाराची २० वर्ष, बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्य जगण्याचा…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे ते म्हणाले की, “मी असं केलं नाही तर मरेन. मी माझ्याच क्षेत्रामध्ये खूप निराश आहे. इथल्या मानसिकतेची मला किळस वाटते”. दरम्यान याचवेळी या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मंजुम्मेल बॉइज’ बद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “हिंदीमध्ये असा चित्रपट कधीही बनणार नाही. पण जर या चित्रपटाला यश मिळाले तर या चित्रपटाचा रिमेक बनू शकतो. इथे ज्याला आधी यश मिळाले आहे त्याचा रिमेक बनवला जातो. काही नवीन करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही”.

आणखी वाचा – शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं गर्लफ्रेंडबरोबर नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “नवीन वर्षात तरी…”

याबरोबरच अनुराग यांनी टॅलेंट एजंसीवरदेखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सध्याच्या पिढीबरोबर काम करणे खूप कठीण आहे. कारण त्यांना अभिनय करायचा नाही पण लगेच स्टार बनायचं आहे. एजंसी आधी कोणालाही स्टार बनवत नाहीत. पण ज्यावेळी स्टार बनतात तेव्हा त्यांच्याकडून खूप पैसा उकळतात”, असं त्यांनी सांगितलं आहे.  

Tags: anurag kashyapfilm directorfilm maker
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
hemant dhome on kshitee jog

बायकोच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा देत हेमंत ढोमेने व्यक्त केलं प्रेम, म्हणाला, "पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.