शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेयस तळपदेच्या सुखी संसाराची २० वर्ष, बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्य जगण्याचा…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shreyas talpade wedding anniversary

श्रेयस तळपदेने साजरा केला लग्नाचा विसावा वाढदिवस

मराठी मनोरंजन क्षेत्रातील श्रेयस तळपदे हा लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीबरोबरच तो अनेक हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. नुकताच तो ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. ‘पुष्पा’  व ‘पुष्पा २’ या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता अल्लू अर्जुनला हिंदी डबसाठी श्रेयसचा आवाज ऐकायला मिळतो. त्यामुळे मराठी, हिंदीबरोबरच त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. श्रेयस त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र फारसा व्यक्त होत नाही. मात्र सध्या त्याच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने बायको दीप्ती तळपदेबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.  (shreyas talpade wedding anniversary)

श्रेयसचा आज लग्नाचा २० वा वाढदिवस आहे. ३१ डिसेंबर २००४ साली तो दीप्तीबरोबर लग्नबंधनात अडकला. आजवर दीप्तीने त्याला खूप साथ दिल्याचे अनेकदा श्रेयसने सांगितले आहे. अशातच त्याने एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लग्नाच्या दिवशीचा व सध्याचा असे दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “आज २० वर्ष झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दीप्स. मला माझे आयुष्य जगण्याचा इतर कोणताही मार्ग माहीत नाही. पण तू नेहमी माझ्याबरोबर असशील. आय लव्ह यू. मी नेहमी करतो आणि करत राहीन”.

आणखी वाचा -‘नवरा माझा…’ फेम अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा थाटामाटात संपन्न, सुंदर लूकने वेधलं लक्ष, लवकरच अडकणार लग्नबंधनात, व्हिडीओ व्हायरल  

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

पुढे त्याने लिहिले की, “काही गोष्टी कधीही बदलत नाहीत. पहिला घास हा नेहमीच तुझा असेल”. या पोस्टवर अनेक नेटकरी व कलाकारांनी पसंती दर्शवली आहे. तसेच प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाली खरेने प्रतिक्रिया देत लिहिले की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, क्रांती रेडकरनेदेखील शुभेच्छा दिल्या असून श्रेया बुगडे, प्रार्थना बेहेरे, मेघना एरंडे, संदीप पाठक यांनी इमोजी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं गर्लफ्रेंडबरोबर नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “नवीन वर्षात तरी…”

 डिसेंबर २०२३ मध्ये श्रेयसला हृदयविकाराचा खूप मोठा झटका आला. ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो लगेच घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दीप्ती त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने झटापटीने प्रसंगावधान राखल्यामुळे श्रेयसवर आलेले हे संकट दूर झाले.    

Tags: deepti talpadeshreyas talpadewedding anniversary
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Anurag kashyap viral statement

बॉलिवूडला कंटाळून दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबई सोडणार, स्वतः खुलासा करत म्हणाले, “खूप किळस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.