शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा, नव्या वर्षात दिली गूडन्यूज, म्हणाला, “पुन्हा एकदा आई-बाबा”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hashank ketkar second child announcement

शशांक केतकरच्या पुन्हा एकदा होणार बाबा

मराठी अभिनेता शशांक केतकर हा सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. शशांक आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये दिसून आला आहे. त्याच्या सर्वच भूमिकांना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. मराठी चित्रपट व मालिकांबरोबरच तो हिंदी वेबसीरिजमध्येही दिसून आला आहे. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असलेला बघायला मिळतो. अभिनयामध्ये निपुण असलेला शशांक सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गमतीशीर प्रसंग असो किंवा सामाजिक हिताचे कोणतेही मत असो तो नेहमी सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे मांडताना दिसतो. अशातच आता त्याच्या एका नवीन पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (shashank ketkar second child announcement)

शशांक २०१७ साली प्रियांका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना ऋग्वेद नावाचा मुलगाही आहे. मुलाबरोबरचे अनेक फोटो व गमतीशीर व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बाप-लेकाचे गोड व्हिडीओ प्रेक्षकांच्या खूप पसंतीसही पडतात. अशातच आता शशांकने एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्याच्या घरी पुन्हा एकदा नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावर बायको व मुलाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रियाका गरोदर असल्याचे दिसत आहे. शशांकने पोस्ट करत लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत”.

आणखी वाचा – 01 January Horoscope : 2025 वर्षाचा पहिला दिवस तुमच्या आयुष्यात आणणार सुख, शांती अन् समृद्धी, अधिक जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

दरम्यान या पोस्टमध्ये प्रियांका गरोदर दिसत असून  तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा वनपीस घातला आहे. तसेच केसात फुलदेखील दिसून येत आहे. शशांकनेदेखील गुलाबी रंगाची हुडी व कॅज्युअल पॅंट घातली आहे. त्याचप्रमाणे अजून दोन फोटोंमध्ये त्यांचा मुलगा ऋग्वेददेखील दिसून येत आहे. यामध्ये सगळेच खूप आनंदी असलेले दिसून येत आहेत. दऱम्याने शशांकच्या या पोस्टवर अभिनेत्री तीतिक्षा तावडे, आनंदी जोशी या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कलाकार आता काय करतात?, कसं सुरु आहे कलाकारांचं आयुष्य?, जाणून घ्या…

या आधी म्हणजे डिसेंबर महिन्यात शशांक व प्रियांकाच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. यावेळी त्याने बायकोसाठी सोशल मीडियावर खास पोस्टही शेअर केली होती. त्याने लिहिले की, “फक्त ७ वर्ष झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम आणि तू एका बाजूला”, असं कॅप्शन देत शशांकने त्याच्या बायकोबरोबरच्या आठवणी शेअर केल्या होत्या.      

Tags: pregnancy announcementpriyanka dhavaleshashank ketkar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
hemal ingle mehndi ceremony

‘नवरा माझा...’ फेम अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा थाटामाटात संपन्न, सुंदर लूकने वेधलं लक्ष, लवकरच अडकणार लग्नबंधनात, व्हिडीओ व्हायरल  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.