रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता वालावलकरची लगीनघाई! लग्नपत्रिकेचा पहिला फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2025 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar wedding card first photo viral and Kunal Bhagat started crying after seeing card

अंकिता वालावलकरच्या लगीनघाईला सुरुवात, लग्नपत्रिका पाहताच होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर

सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे अंकिता वालावलकर. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात  सहभागी झालेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच चर्चेत राहिली आहे. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या हाताचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच तिने बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला.  सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून अंकिताच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Ankita Walawalkar wedding card)

अशातच आता कोकण हार्टेड गर्लची लग्नपत्रिका समोर आली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नपत्रिकेची खास झलक शेअर केली आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानांवर तिचे व कुणालचे नाव लिहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. कुलदेवत व आजोळच्या देवाला तिने लग्नाची ही पहिली पत्रिका अर्पण केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”

अंकिता व कुणाल यांच्या लग्नाची ही पत्रिका पाहून कुणालला अश्रु अनावर झाल्याचेही पाहायला मिळत आहे. अंकिताने कुणालची एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात लग्नपत्रिका बघताच तो भावुक होतो आणि त्याला अश्रु यांवर होतात. यावर अंकिता त्याची मस्करी करत “आताच का रडत आहेस. नंतर लग्नात रड, तेव्हा खूप सारे फोटोग्राफर्स असतील, आता नको रडूस मला तुला तेव्हा रडताना बघायचं आहे”. अंकिताची ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, मात्र हे सत्य की असत्य? नवीन प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यापासून अंकिताच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना ती लग्नबंधनात कधी अडकणार यांची उत्सुकता लागून् राहिली आहे. अशातच आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते मंडळी तिच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.   

Tags: Ankita Walawalkar wedding cardAnkita Walawalkar wedding card first photoBigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dancer Gautami Patil supported to actress Prajakta Mali and gave advice not pay attention to trolling

"फक्त नेत्याबरोबरच नाही तर...", प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, "एका कलाकाराचं दु:ख..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.