शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, वास्तुशांतीवेळी उखाणा घेताना रडली बायको, भावुक व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Ruturaj Phadke wife shared a video ukhana she took at Vastushanti Pooja of the new home

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, वास्तुशांतीवेळी उखाणा घेताना उखाणा घेताना बायकोला अश्रु अनावर, व्हिडीओ व्हायरल

२०२३ हे वर्ष मराठीतील अनेक कलाकारांसाठी लाभदायी ठरले. २०२४ या वर्षात कुणी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. तसंच २०२४ या वर्षात कुणी नवीन गाडी घेतली तर, कुणी नवीन घरही घेतलं. २०२४ मध्ये मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, ऐश्वर्या-अविनाश नारकर, अमृता खानविलकर, शिवाली परब व रोहित माने यांसारख्या अनेकांनी नवीन घर घेतलं. या वर्षात आणखी एका अभिनेत्याचे नवीन घराचे स्वप्न साकार झाले आणि हा अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. ऋतुराजने बायकोबरोबर घराची किल्ली हातात पडकत एक फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला होता. (Ruturaj Phadke wife ukhana video)

हा फोटो शेअर करत त्याने दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेतल्याची माहिती दिली होती. ऋतुराजने याबाबत एक पोस्टही लिहिली होती. ऋतुराजची पत्नी प्रीती हिने याबद्दल एक खास पोस्टही लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं होतं की, “स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते कसंही असो, लहान किंव्हा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है’ हे आम्ही अनुभवलं”.

View this post on Instagram

A post shared by Priti Risbood Phadke (@pretty_priti16)

आणखी वाचा – “निर्मात्यांनी एक वर्ष होऊन पैसे दिले नाहीत”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची तक्रार, भडकून म्हणाली, “माझी मोठी चूक…”

अशातच अभिनेत्याच्या या नवीन घराची वास्तुशांती नुकतीच पार पडली आहे आणि या वास्तुशांती सोहळ्याची खास झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या वास्तुशांतीच्या पूजेवेळी ऋतुराजच्या पत्नीने खास उखाणाही घेतला. यावेळी ती म्हणाली की, “दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न, अखेर आज तो दिवस आला, स्वत:चं हक्कांचं घर घेऊन खूप आनंद झाला, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच असुदेत पाठीशी. ऋतुराज रावांचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी”. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – “जे स्वप्न पाहिलं होतं ते…” रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लग्नाचा खास व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओखाली त्यांना नवीन घरानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतून ऋतुराज फडके घराघरांत पोहोचला होता. या मालिकेत त्याने कार्तिक ही भूमिका साकारली होती. अनेक नाटकांत व मालिकेत काम केलेल्या ऋतुराजला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २७ जानेवारीला ऋतुराजने प्रितीबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags: ruturaj phadkeRuturaj Phadke new homeRuturaj Phadke wife ukhana video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
varun dhawan daughter first look

Video : वरुण धवनच्या लेकीचा चेहरा पहिल्यांदाच समोर, व्हिडीओमध्ये दिसली झलक, दिसते एवढी क्युट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.