रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “लग्न झालंय मस्त आता…’, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा थाटामाटात गृहप्रवेश, असं आहे घर, बायकोचीही धमाल

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 27, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shalva kinjawadekar and shreya daflapurkar gruhpravesh

शाल्व-श्रेयाच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेतून शाल्व किंजवडेकर हा अभिनेता घराघरात पोहोचला. त्याच्या अभिनयाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला बघायला मिळतो. शाल्व मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कॉस्ट्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट श्रेया डफळापूरकरबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख निवडला होता. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. अशातच आता दोघे अखेर विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अशातच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (shalva kinjawadekar and shreya daflapurkar gruhpravesh)

शाल्व व श्रेया यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळाले. नुकताच दोघांचाही गृहप्रवेशाचा व्हिडीओ बघायला मिळत आहे. यामध्ये श्रेयाने सुंदर अशी लाल-गुलाबी अशा रंगाची आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम असलेली साडी नेसली आहे. तसेच शाल्वने निळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा व सोनेरी रंगाचा दुपट्टा घेतला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच घराला केलेली सुंदर अशी सजावट दिसून येत आहे. तसेच दारात फुलांची आरास केलेली दिसून येत आहे. त्यानंतर दारात आल्यानंतर श्रेया व शाल्व उखाणा घेतात. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खूण, शाल्वचं नाव घेते किंजवडेकरांची सून”, असा उखाणा श्रेया घेते.

आणखी वाचा – Video : ना भरजरी साडी, ना महागडे दागिने, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा लग्नासाठी साधाच लूक, मंगळसूत्राच्या डिझाइनची रंगली चर्चा

View this post on Instagram

A post shared by Shreya Daflapurkar Kinjawadekar (@shreya_daflapurkar)

त्यानंतर शाल्व उखाणा घेत म्हणतो की, “लग्न झालं आहे मस्त, ओलांडणार आहे माप, बायको म्हणून तू आता मला हवं तेवढं काप”. दरम्यान शाल्वचा उखाणा यावेळी जास्तच हटके असलेला दिसून आला. उखाणे घेतल्यानंतर श्रेया माप ओलांडून घरी येते. आरती करुन तिचे नव्या सुनेचे घरात आगमन होते. त्यानंतर दोघंही घरातील देव्हाऱ्यासमोर देवाचे आशिर्वाद घेतात. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळालेली दिसून येत आहे.    

आणखी वाचा – Video : रत्नागिरीत हळदीसाठी पोहोचली नोरा फतेही, धमाल डान्स, कोकणी पद्धतीचं जेवण अन्…; व्हिडीओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून शाल्वच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्नसमारंभाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन समोर आले. शाल्व आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली.

Tags: gruhpraveshShalva Kinjavdekar And Shreya DafalapurkarShalva Kinjawadekar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
suraj chavhan home

Video : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात, स्वतःही घेत आहे मेहनत, व्हिडीओमध्ये दाखवली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.