शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अली असगरची छोट्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री, वेगळ्याच रुपात दिसणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 24, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ali asgar on television serial

अली असगर दिसणार आता नव्या रूपात

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता अली असगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या खूप काळापासून ते टेलिव्हीजनपासून दूर असलेले बघायला मिळतात. त्यांनी टेलिव्हीजनपासून इतका दुरावा का निर्माण केला याबद्दल मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. आजवर ते अनेक टेलिव्हीजन मालिका, कार्यक्रम व अनेक हिंदी चित्रपटामध्ये भूमिका साकारताना दिसले. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. ‘कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. नंतर मात्र ते गायब झाले. संपूर्ण देशभरात त्यांचे चाहते आहेत. खूप काळ टीव्हीवर न दिसल्याने ते पुन्हा कधी दिसणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या. (ali asgar on television serial)

अशातच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकर अली छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत. अली यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच ते आता वागळे की दुनिया- नवीन पिढी नवीन किस्से’ या मालिकेत कॅमियो करताना दिसणार आहेत. त्यांनी सांगितले की, “मी वागळे की दुनिया या मालिकेमध्ये काम करणार आहे. यासाठी मी खूप खुश आहे. ही एक कल्ट क्लासिक आहे आणि चाहते याला खूप पसंत करत आहे. ही मालिका खूप भावनात्मक आहे. हरीश खन्ना असे माझ्या भूमिकेचे नाव आहे. तसेच स्टँडअप कॉमेडियन आहे. ही भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मी आता नवीन एपिसोडसाठी वाट नाही बघू शकत”.

आणखी वाचा – ऑरीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात वर्णी, साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका

View this post on Instagram

A post shared by Ali Asgar (@kingaliasgar)

या मालिकेमध्ये सुमित राघवनदेखील दिसून येत आहे. सुमित म्हणाला की, “अली असगर एक खूप प्रभावशाली विनोदी अभिनेते आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेमध्ये माझी राजेश ही भूमिका आहे. राजेशचा लहानपणीचा मित्र म्हणून मी ही भूमिका साकारत आहे. अली यांचे टायमिंग कमालीचे आहे. राजेश व हरिश यांची लहानपणीची मैत्री काय जादू करणार हे आता पाहाण्यासारखे आहे”.

आणखी वाचा – प्रसिद्ध गायिकेने मध्येच बंद केला लाईव्ह कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागितली आणि मंचावरुन उतरली, नक्की झालं तरी काय?

‘वागळे की दुनिया’ ही मालिका 2021 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये सुमित राघवन, परवा प्राणिती, अंजन श्रीवास्तव व इतर कलाकार दिसून येत आहेत. ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे.

Tags: ali asgarcomedy rolewagale ki duniya
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Allu Arjun Pushpa 2 movie urinating in a swimming pool scene Congress leader filed a complaint against actor and director

अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबता थांबेना, चित्रपटात 'तो' सीन करणं भोवलं, काँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.