शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोणी अगदी कमी खर्चात, तर कोणी शाही थाटात केलं लग्न, मराठी कलाकारांची लग्न या वर्षात सर्वाधिक चर्चेत, सुखाने करत आहेत संसार

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2024 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 11 mins read
google-news
Shalva Kinjwadekar-Shreya Daflapurkar, Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar, Reshma Shinde-Pawan, Abhishek Gaonkar-Sonali Gurav, Prithvik Pratap-Prajakta Vaykul got married in the year 2024.

२०२४ या वर्षात ‘या’ कलाकार जोडप्यांनी लग्नगाठ बांधत केली नव्या आयुष्याला सुरुवात

२०२४ हे वर्ष आता सरत आलं आहे. अवघ्या काही दिवसांतच नवीन वर्ष सुरू होईल. या वर्षात मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. या वर्षात लग्नबंधनात अडकणारे हे कलाकार कोणते? चला जाणून घेऊया… (Marathi Artists Marriages in 2024)

  • शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापुरकर : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ या मालिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर. शाल्वने नुकतीच त्याच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर शाल्व व त्याची बायको श्रेया डफळापुरकर यांनी १४ डिसेंबर रोजी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. शाल्वची बायको श्रेया ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे.
View this post on Instagram

A post shared by Shreya Daflapurkar Kinjawadekar (@shreya_daflapurkar)

  • किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर : ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. किरण-वैष्णवीचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्नसोहळा पार पडला.
View this post on Instagram

A post shared by Mansi sutar Makeup Artist | Kolhapur (@mansimakeupstudio_)

  • रेश्मा शिंदे व पवन : ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. २९ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. २९ नोव्हेंबरला तिने बॉयफ्रेंड पवनबरोबर लग्नगाठ बांधली. रेश्माने महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. पवन हा साऊथ इंडियन आहे.
View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

  • अभिषेक गावकर व सोनाली गुरव : ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरने रिलस्टार सोनाली गुरवबरोबर २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. अभिषेक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram

A post shared by वामिका अभिषेक गांवकर (@sonaleee13)

  • पृथ्वीक प्रताप व प्राजक्ता वायकुळ : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. पृथ्वीक प्रतापने २५ ऑक्टोबर दिवशी त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या प्राजक्ता वायकुळशी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.
View this post on Instagram

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

  • निखिल राजशिर्के व चैत्राली मोरे : रंग माझा वेगळा, अरुंधती, छोटी मालकीण, माझी तुझी रेशीमगाठ, मुव्हिंग आऊट  अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या निखिल राजशिर्केनेही नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.  चैत्राली मोरे हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं निखिल लग्नगाठ बांधली 
Tags: kiran gaikwad and vaishnavi kalyankar marriageReshma Shinde and Pawan marriageShalva Kinjwadekar and Shreya Daflapurkar Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sonakshi sinha funny reel

सोनाक्षी सिन्हाच्या आई व सासूला हवी आहेत नातवंड, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, "नातवंडांशिवाय …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.