रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांची हवाई सफर, खास फोटोही केला शेअर, नेटकऱ्यांसह कलाकारांनीही केलं कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2024 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Alka Kubal traveled by a plane where her daughter is a pilot post shared on instaagram

लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचा विमानप्रवास, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. एक आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलका कुबल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावरून त्या चाहत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या महत्त्वाच्या घडामोडी त्या चाहत्यांची शेअर करत असतात. (Alka Kubal daughter ishani)

अलका कुबल यांना दोन मुली आहेत. पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली. आता ती वैमानिक म्हणून कार्यरत आहे. तिच्याचबद्दलची एक पोस्ट अलका यांनी नुकतीच सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

अलका कुबल यांनी नुकतीच आपली लेक ईशानी वैमानिक असलेल्या विमानाने प्रवास केला आहे आणि याची खास झलक त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. लेकीबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी “आजच्या फ्लाइटसाठी माझी कॅप्टन” असंही म्हटलं आहे आणि या फोटोमध्ये दोघींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्याशिवाय अलका कुबल यांच्या चेहऱ्यावर आनंद, कौतुक व अभिमान असे भाव पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – 22 December Horoscope : वृषभसह ‘या’ राशींसाठी सुखसमृद्धीचा योग, जाणून घ्या रविवारचा दिवस कसा असेल?

अलका कुबल यांनी शेअर केलेल्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी तसंच अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अमेय वाघ, सुकन्या मोने, पल्लवी पाटील, चैत्राली गुप्ते, ऋजुता देशमुख, हेमंत ढोमे यांसारख्या अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अलका कुबल यांच्या लेकीचे कौतुक केलं आहे.       

आणखी वाचा –  “I Love You Leela” म्हणत एजेंनी दिली प्रेमाची कबुली, लीला काय उत्तर देणार? रोमॅंटिक प्रोमो समोर

दरम्यान, अलका कुबल यांनी मोठी मुलगी ईशानी आठल्ये हिला लहानपणापासून विमानाची आवड… याच आवडीतून तिने वैमानिकाचे शिक्षण घेतले. त्यासाठी तिने विशेष परिश्रमही घेतले. तिचे हे परिश्रम फळाला आले असून ती आता यशस्वी व्यावसायिक विमान पायलट झाली आहे.  

Tags: alka kubalalka kubal daughterAlka Kubal daughter ishani
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Pushpa 2 movie premiere Hyderabad Sandhya Theater stampede case Actor Allu Arjun give explanation for the first time

“मी कायद्याचे पालन करणारा...”, हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणावर अल्लू अर्जुन स्पष्टच बोलला, म्हणाला, “पोलिसांच्या परवानगीनेच...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.