शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आडनावावरुन…”, सततच्या ट्रोलिंगवर भडकला अर्जुन कपूर, म्हणाला, “मी अभिनय करण्याच्या लायकीचा…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 21, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arjun kapoor on trolling

अर्जुन कपूर खासगी आयुष्याबद्दल झाला व्यक्त

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये त्याने खालनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. अशातच आता त्याने त्याच्या आयुष्यावर उघडपणे भाष्य केले आहे. २०११ साली त्याने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील दिसून आली होती. त्यानंतरही तो अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. मात्र त्याला मनोरंजनसृष्टीमध्ये हव तसं नाव कमावता आलं नाही. त्याला अनेकदा ट्रोलदेखील केले गेले. यावरुन आता त्याने भाष्य केले आहे. तो नक्की काय म्हणाला ते जाणून घेऊया. (arjun kapoor on trolling)

अर्जुन नुकताच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने ट्रोलिंगवर खुलेपणाने भाष्य केले. आयुष्यात अपयशी व्हावे असे अनेकांना वाटत असल्याचेही तो म्हणाला. याबद्दल तो म्हणाला की, “लोकांना वाटत होतं की मी अपयशी व्हावं. अनेकदा तर माझ्या आडनावावरुनही बोलले गेले. याशिवाय अनेकांनी माझ्या खासगी आयुष्याबद्दल आणि माझे जे चित्रपट चालले नाहीत याबद्दलही खूप चर्चा केली”.

आणखी वाचा – नाकाच्या शस्त्रक्रियेमुळे प्रियंका चोप्राची अनेक चित्रपटांमधुन झालेली हकालपट्टी, प्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाला, “तिची चूक…”

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन पुढे म्हणाला की, “मी माझ्या कामाची चिंता नाही. अनेकजण तर मी अभिनय करण्याच्या लायकीचा नाही असंही म्हणतात. हे सगळं मी तेव्हा ऐकलं जेव्हा मी माझ्या करियरच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर होतो. माझ्या शारीरिक समस्यांना खूप वाढल्या होत्या. मी माझ्या आजाराबद्दलही अनेकदा भाष्य केले आहे. त्यावेळी अनेक टिकाकारांनी माझ्यावर भाष्य करणं योग्य समजलं”.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या पाच वर्षांनी राकेश बापटच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं नात्याविषयी भाष्य, म्हणाली, “आम्ही विभक्त असलो तरी…”

सध्या अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्याची एक्स गर्लफ्रेंड मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. अर्जुन व मलायकाने २०१८ साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातंदेखील स्वीकारलं होतं. दोघं अनेकदा पार्टीमध्ये, डिनरला, आऊटिंगदरम्यान दिसून यायचे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे सगळं बंद केलं.        

Tags: arjun kapoorbollywood actortrolling
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actress Akshaya Deodhar talked on her mother-in-law, mother and husband Hardik Joshi reaction to her Lakshmi Niwas serial

अक्षया देवधर पुन्हा मालिकेत काम करणार कळताच सासूबाई एकदम खूश, प्रोमो पाहून भारावल्या, म्हणाली, "टीव्हीवर दिसणार म्हणून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.