शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटेने शेअर केले लग्नाचे Unseen Photo, म्हणाला, “आमच्या श्री. व सौ.च्या प्रवासाला…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saregamapa Little Champs fame singer Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared an unseen wedding photo on one year wedding anniversary.

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम प्रथमेश लघाटेने शेअर केले लग्नाचे Unseen Photo

मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुग्धा व प्रथमेश ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले तेव्हापासूनच त्यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.  (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Anniversary)

गेल्यावर्षी म्हणजेच २१ डिसेंबर २०२३ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला मित्रपरिवार व कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा. दोघांनीही अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच त्यांचे लग्नापूर्वीचे विधी उरकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

आणखी वाचा – एकीकडे अप्पी-अर्जुनचे लग्न, तर दुसरीकडे अमोलची आयुष्याशी झुंज, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका निर्णायक वळणावर

अशातच आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. “आमच्या चि व चि सौ कां ते श्री व सौ च्या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालं” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. मुग्धा-प्रथमेश यांनी लग्नात खास लूक केला होता. यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी व प्रथमेशने मरुन रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर असा खास लूक केला होता. तसंच डोक्यावर पेशवाई स्टाइल पगडीही घेतली होती.  

आणखी वाचा – घटस्फोटाच्या पाच वर्षांनी राकेश बापटच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं नात्याविषयी भाष्य, म्हणाली, “आम्ही विभक्त असलो तरी…”

मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे हे फोटो व त्यांची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी दोघांना त्यांच्या लग्नाच्या वर्षपुर्तीनिमित्त कमेंट्स करत खास शुभेच्छाही दिल्या आहेत. “खूप खूप अभिनंदन”, “खूप खूप शुभेच्छा”, “असेच कायम एकत्र राहा” अशा कमेंटसद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Anniversaryprathamesh laghate and mugdha vaishampayanprathamesh laghate and mugdha vaishampayan marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
arjun kapoor on trolling

"माझ्या आडनावावरुन…", सततच्या ट्रोलिंगवर भडकला अर्जुन कपूर, म्हणाला, "मी अभिनय करण्याच्या लायकीचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.