शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगणा रणौतचा दिलजित दोसांझला फुल्ल सपोर्ट, दारु-सिगारेटच्या गाण्यांवर अभिनेत्री म्हणाली, “लोकांची जबाबदारी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 21, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut on diljit dosanjh

कंगना रणौतचा दिलजीत दोसांजला पाठिंबा

सध्या बॉलिवूड व पंजाबी गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आला आहे. संपूर्ण भारतात त्याने ‘दिलूमिनाती’ कॉन्सर्ट आयोजित केले होते. नुकताच त्याचा मुंबई येथे एक कॉन्सर्ट पार पडला. दरम्यान या वेळी त्याच्या कॉन्सर्टवरुन मोठ्या प्रमाणात चर्चादेखील होताना दिसून आली. आंध्रप्रदेश, पंजाब, तेलंगणा, राजस्थान व महाराष्ट्रातील कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्ज यासंबंधित गाण्यांवर बंदी आणली गेली. यामुळे मोठा वाददेखील निर्माण झाला. अशातच आता या सगळ्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केले आहे. आजवर कंगना व दिलजीत यांच्यामध्ये वाद असलेले दिसून आले. मात्र आता कंगनाने दिलजीतला पाठिंबा देत भाष्य केलेले दिसून येत आहे. कंगना नक्की काय म्हणाली? हे जाणून घेऊया. (kangana ranaut on diljit dosanjh)

कोणत्या नियमांचे पालन केले जात नाही? याबद्दल कंगनाने भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “गाण्यांमधून तुम्ही प्रत्येक गोष्ट काढून टाकाल. चित्रपटांमधून प्रत्येक गोष्ट काढाल. पण असे अनेक राज्यांमध्ये दारु बंद आहे पण खरच तिथे दारु मिळत नाही का? जर इतक्या साऱ्या गोष्टी अवैध असतील तर त्या गोष्टी अवैध नाहीत का?”.

आणखी वाचा – “कॉफी मग डोक्यावर मारला अन्…”, शाहरुख खानने कानाखाली मारल्याच्या घटनेवर हनी सिंगचं भाष्य, म्हणाला, “शो दरम्यान माझा मृत्यू…”

View this post on Instagram

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

पुढे ती म्हणाली की, “किती आपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्या ठिकाणी हे नियम कोण पाळतं? मला हे म्हणायचं आहे की ही लोकांची जबाबदारी नाही का?”, कंगनाचे हे वक्तव्य अधिक चर्चेत आले आहे. दरम्यान या आधी १४ डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये कॉन्सर्ट करण्याआधी त्याला नोटिस पाठवण्यात आली होती. यामध्ये दारुचे समर्थन असणारे एकही गाणे गाऊ नये. तसेच लहान मुलांना मंचावर घेऊन जाता येणार नाही असेही सांगण्यात आले होते.

आणखी वाचा – “कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला स्वत:च्या अपहरणाचा संपूर्ण थरार, म्हणाले, “डोक्यावर बंदूक रोखली आणि…”

भारतातील दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंजाबी सुपरस्टारने दिल्लीहून आपल्या दिल लुमिनाटी टूरची शानदार सुरुवात केली होती. यानंतर त्याने जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, पुणे, कोलकाता आणि बेंगळुरू, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.

Tags: diljit dosanjhdiluminati tourkangana ranaut
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla fame Raqesh Bapat ex wife Riddhi Dogra commented on their divorce.

घटस्फोटाच्या पाच वर्षांनी राकेश बापटच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं नात्याविषयी भाष्य, म्हणाली, “आम्ही विभक्त असलो तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.